पुणे: महिलेवर काळी जादू आणि लैंगिक छळ करणाऱ्या वडील- मुलावर गुन्हा दाखल; व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत करत होते अत्याचार
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

एकीकडे दिवसागणिक विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये देश प्रगती पथावर वाटचाल करत असताना आजही समाजातील मोठा भाग अंधश्रद्धा आणि तंत्रमंत्राच्या जाळ्यात अडकलेला दिसतो. याचेच एक उदाहरण सध्या पुणे (Pune) येथे पाहायला मिळाले. समर्थ पोलीस स्थानकात दाखल झालेल्या तक्रारीनुसार एका वडील- मुलाच्या जोडगोळीने ढोंगी तंत्रमंत्र करताना एका महिलेला धमकावत तिचा लैंगिक छळ केल्याचे समजत आहे. सुरुवातीला या दोघांनी महिलेवर काळी जादू (Black Magic)  करतानाचा एक व्हिडीओ काढला आणि काही दिवसात हा व्हिडीओ व्हायरल करू अशी धमकी देत तिच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली. याप्रकरणी पोलिसांनी नंदकुमार वसंत भागवत आणि मुलगा अभिजित भागवत यांच्यावर अत्याचार व अघोरी काम करण्याच्या गुन्ह्याअंतर्गत आरोप दाखल केले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, रस्ता पेठ येथे राहणारे भागवत पिता- पुत्र मागील काही काळापासून काळी जादू आणि तंत्रमंत्र करण्याचा व्यवसाय लपून छपून करत होते,आपल्या वैयक्तिक कारणासाठी ही पीडित महिला सुद्धा त्यांच्याकडे गेली होती. त्यावेळी काळी जादू करतानाचा हा व्हिडीओ काढून या दोघांनी तिला धमकावायला सुरुवात केली. इतकेच नव्हे तर तिचा लैंगिक छळ करताना व्हिडीओ व्हायरल करू असे सांगत पैसे देखील उकळले. या प्रकरणामुळे घाबरून गेलेल्या महिलेला पोलिसांकडे जाण्याची हिंमत सुद्धा होत नव्हती म्ह्णूनच तिने आपल्या ओळखीतील काही महिलांकडे याबाबत वाच्यता केली. रविवारी (3 नोव्हेंबर) या महिलांच्या ग्रुपने एकत्र जाऊन या ढोंगी जोडीवर हल्ला केला, तसेच मारहाण करत त्यांना गुन्हा कबुल करायला लावला व मग पोलिसांसमोर उभे केले.

मुंबई: 15 वर्षीय मुलाने 21 वर्षाच्या तरुणीवर केला बलात्कार; लग्नाच्या बहाण्याने दिला धोका

दरम्यान, पोलिसांच्या माहितीनुसारमी आता समोर आलेल्या तक्रारीत जरी एकच महिलेवर अत्याचार झाल्याचे समजत असले तरी अशा अनेक पीडिता असू शकतात त्यामुळे याप्रकरणी आणखीन सखोल चौकशी केली जाईल. तूर्तास, भागवत वडील- मुलावर काळी जादू प्रतिबंधक कायदा, लैंगिक छळ, धमकावणे आणि अघोरी कृत्य प्रतिबंधक नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.