मुंबई: 15 वर्षीय मुलाने 21 वर्षाच्या तरुणीवर केला बलात्कार; लग्नाच्या बहाण्याने दिला धोका
Image For Representaion (Photo Credits: File Image)

गुन्हेगारी प्रवृत्तीला वयाचे बंधन नसते या वाक्याची सार्थ पटवणारी एक तक्रार नुकतीच मुंबई  पोलिसांकडे (Mumbai Police) दाखल करण्यात आली. लग्नाच्या बहाण्याने एका 21 वर्षांच्या तरुणीवर 15 वर्षांच्या मुलाने बलात्कार (Rape)  केला. हा आरोप खुद्द पीडित तरुणीने लगावला आहे. या तरुणीच्या आरोपानंतर तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली ज्यामध्ये या मुलीवर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान,संबंधित प्रकरणी आता ज्युवेनाईल जस्टिस बोर्ड (Juvenile Justice Board) समोर सुनावणी होणार आहे तूर्तास या मुलाची रवानगी बालसुधारगृहात (Child Rehabilation Center) करण्यात आली आहे. ठाणे: एका तरुणीचा बलात्कार करुन इंस्टाग्रामवर नग्न छायाचित्र व्हायरल करणाऱ्या नराधमाला अटक

प्राप्त माहितीनुसार, या मुलाने स्वतःची बाजू सांगताना "आम्ही दोघंही घरातून पळून गेलो होतो आणि लग्नही करणार होतो असे सांगितले तर मुलीने, या मुलासोबत पळून गेल्याची कबुली दिली मात्र या मुलाने आपल्याला जबरदस्ती एका हॉटेलच्या खोलीत डांबून ठेवले होते. आणि तिथेच माझे लैंगिक शोषण करून बलात्कार केल्याची तक्रार तिने नोंदवली आहे.

मुंबई: प्रेमासाठी महिलेने आपल्याच बहिणीचे न्यूड फोटो पाठवले प्रियकराला

दरम्यान पोलिसांच्या तपासात हे दोघेही एकमेकांना ओळखत असून आणि पंधरा दिवसांपूर्वी स्वतःच्या राहत्या घरून पळून गेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आणि तिच्या आईच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदवण्यात आला आहे.