मुंबई: प्रेमासाठी महिलेने आपल्याच बहिणीचे न्यूड फोटो पाठवले प्रियकराला
Representational Image | (Photo Credits: File Photo)

प्रेमासाठी प्रेमी युगुलं काय करतील आणि काय नाही करणार याचा नेम नाही. अशाच पद्धतीचा एक प्रकार मुंबईत घडला असून प्रेमाखातर महिलेने आपल्याच बहिणीचे अश्लिल फोटो प्रियकराला पाठवले. सदर महिला ही 25 वर्षीय असून तिने बहिणीचे अंघोळ करतानाचे न्यूड फोटो काढले. एवढेच नाही फोटो काढल्यानंतर तिने ते प्रियकराला पाठवले. तसेच प्रिकराने हे फोटो तिच्या नातेवाईकांना सुद्धा पाठवले. या प्रकरणापासून वाचण्यासाठी प्रियकराने पळ काढला आहे.

याबाबत अधिक माहिती देत आग्रीपाडा पोलिसांनी असे सांगितले की, आरोपी महिलेचे एक लग्न झालेल्या पुरुषासोबत प्रेमप्रकरण सुरु होते. तसेच सदर विवाहित पुरुष हा भायखळा येथे राहत असून आरोपी महिलेच्या आईला या दोघांच्या नात्याला विरोध होता. पोलिसांनी पुढे असे सांगितले की, नवरात्रौत्सवाच्या दरम्यान आरोपीने प्रेयसीच्या बहिणीला दांडीच्या काठ्यांनी मारहाण केली. त्यानंतर आरोपी व्यक्तीची बायकोसुद्धा या भांडणात सहभागी झाली. त्यानंतर स्थानिकांनी आरोपीच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला.(औरंगाबाद: दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या म्हणून तरुणाला तलवारीने भोकसले)

आरोपी प्रियकराने प्रेयसीला असे सांगितले की, जर तुला माझ्यासोबत लग्न करायचे असल्यास त्यासाठी तुझ्या बहिणीचे न्यूड फोटो पाठव. त्यानंतर आरोपीने हेच फोटो नातेवाईकांना सुद्धा पाठवून देत बहिणीच्या सासऱ्यांनाही दिले. या प्रकरणी आरोपी बहिणीला अटक करण्यात आली असून विविध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.