औरंगाबाद: दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या म्हणून तरुणाला तलवारीने भोकसले
Murder | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

दिवाळीच्या सणाला देशभरात सुरुवात झाली असल्याने त्याच्या आनंद सर्वत्र साजरा केला जात आहे. मात्र औरंगाबाद (Aurangabad) येथे दिवाळीच्या सणाला गालबोट लागले आहे. कारण एका तरुणाने दुसऱ्या तरुणाला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्याने त्याला तलवारीने भोकसले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मृत तरुणाच्या घरातील मंडळींनी संताप व्यक्त करत आरोपीच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

न्यूज18 लोकमत यांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन वाघ असे 28 वर्षीय हत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. सचिन याने आरोपीला दिवाळीचा सण असल्याने आनंदात शुभेच्छा दिल्या. मात्र आरोपीने त्या शुभेच्छा स्विकारण्याऐवजी त्याबाबत राग व्यक्त करत सचिनवर धारधार तलवारीने वार केले. घटनास्थळीच सचिनचा मृत्यू झाल्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढून लपून बसले. मात्र न्यायनगर भागातील या प्रकाराची तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सचिनची हत्येबाबत अधिक तपासणी करण्यास सुरुवात केली.(मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे अपघात: महामार्गावरील चुकीच्या पार्किंगमुळे 2 वर्षांत 106 जणांचा मृत्यू)

त्यानंतर पोलिसात सचिनच्या हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर आरोपींचा शोध घेण्यात आला. या प्रकरणी लपून बसलेल्या चार जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर सचिननचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तसेच सचिनच्या घरातील मंडळींना त्याची हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितल्यावर त्यांनी दुख व्यक्त केले आहे. तर ऐन सणासुदीच्या काळात मुलाची हत्या करण्यात आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु असून आरोपींची कसून चौकशी केली जात आहे.