ठाणे: एका तरुणीचा बलात्कार करुन इंस्टाग्रामवर नग्न छायाचित्र व्हायरल करणाऱ्या नराधमाला अटक
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

महाराष्ट्रातील (Maharashra) ठाणे (Thane) परिसरात 20 वर्षीय तरुणीचा बलात्कार (Rape Case) केल्याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. आरोपीने संबधित तरुणीवर बलात्कार केल्यानंतर तिचे नग्न अवस्थेत छायाचित्र टिपून सोशल सोशल मीडियावरही व्हायरल केले. आरोपी आणि पीडीत तरुणी एकमेकांना चांगल्याप्रकारे ओळखतात. अरोपी हा परप्रांती असून ठाणे येथील एका हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करत होता. त्याचबरोबर आरोपीने ठाणे परिसरात इंग्लिश भाषा शिकण्याचा क्लास लावला होता. त्याठिकाणी पीडित तरुणीही येत असे.

गुरुचरण प्रितम सहा (22) असे आरोपीचे नावे आहे. आरोपी हा मुळचा उत्तर प्रदेशातील रहवासी आहे. एप्रिल महिन्यात सहाने पीडित तरुणीला लग्नाचे अमिष दाखवून लॉजवर घेवून गेला. दरम्यान, सहाने तिच्यावर बलात्कार केल्याचे पीडितने पोलिसांना सांगितले. त्यावेळी सहाने पीडितचे नग्न छायाचित्रे काढले होते, असा आरोप पीडितने केला आहे. सहाने पीडितवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर पुन्हा आपल्या राहत्या घरी उत्तर प्रदेश येथे परतला. परंतु, आरोपीने पीडितेचे नग्न छायाचित्र त्याच्या इंस्टाग्रामच्या खात्यावर पोस्ट केले. इंस्टाग्रामवर छायाचित्र पाहून पीडितच्या भावाने तिच्याकडे विचारपूस केली. त्यानंतर पीडित तरुणीने पोलिसात जाऊन सहा विरोधात तक्रार दाखल केली. यानंतर ठाणे पोलिसांनी याप्रकरणी सहाचे मोबाईल ट्रॅक करुन त्याला अटक केली. हे देखील वाचा- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: मानखुर्द- शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार मोहम्मद सिरज शेख बलात्काराच्या आरोपाखाली अटकेत

ठाणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्या कलम 376 आणि कलम 354 कायद्यांर्तगत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.