पुणे: वारकऱ्यांच्या मुक्कामस्थळी सिलेंडरला आग, कोणतीही जीवितहानी नाही
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

पुण्यात (Pune) वारीसाठी निघालेल्या हजारोंच्या संख्येने एका ठिकाणी मुक्काम केला होता. तर आज (27 जून) दुपारी ढोले-पाटील गणपती मंदिराजवळ असलेल्या एका शाळेत वारकऱ्यांनी मुक्काम केला. परंतु शाळेमधील असलेल्या सिलेंडरने अचनाक पेट घेतल्याने वारकऱ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली.

दुपारी 12 वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून शाळेतच्या एका ठिकाणी स्वयंपाक सुरु होता. त्यावेळी अचानक सिलेंडरला अचानक आग लागली. याबद्दल तातडीने अग्निशमन दलाला बोलवण्यात आले. अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे हा अनर्थ टळला.(Pandharpur Wari 2019: संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजांची पालखी आज पुणे शहरात; दगडूशेठ गणपती मंदिराला विशेष सजावट)

या दुर्घटनेत कोणतीच जीवतहानी झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच शाळेत मुक्कामासाठी आलेल्या वारकऱ्यांना आता कोणताच धोका नसल्याचे म्हटले आहे.