पुणे (Pune) येथील काँग्रेस नगरसेवक अविनाश बागवे (Avinash Bagve) यांना अज्ञात व्यक्तीने धमकी दिली आहे. आरोपीने अविनाश बागवे यांना 30 लाख रुपयांची मागणी केली. अज्ञात व्यक्तीने अविनाश बागवे यांना धमकी ते म्हटले की, 30 लाख रुपये खंडणी दिली नाही तर खल्लास करु. समर्थ पोलीस ठाण्यात अविनाश रमेश बागवे (रा. पद्मजी पार्क, भवानी पेठ) यांच्या तक्रारीवरुन अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने बागवे यांना व्हॉट्सअॅप कॉलच्या माध्यमातून फोन केला आणि धमकी दिली.
अविनाश बागवे यांनी पोलिसांना माहिती देताना सांगितले की, आरोपीने बागवे यांना धमकी दिली आणि म्हटले की, 30 लाख रुपयांची खंडणी दिली नाही तर निवडणुकीला उभे राहू देणार नाही. तुला गोळ्या घालून जीवे मारु. संपूर्ण राजकीय कारकीर्दच संपवून टाकू. आरोपी हिंदी भाषेत बोलत होता. जल्दी से पैसै भेजो वर्ना जान से मार दुंगा, असे त्याने म्हटले. त्याने आपण खराडी परिसरातून बोलत असल्याचेही तो म्हणाला. तसेच, मुस्कान शेख अशी आरोपीने आपली ओळख सांगितली. (हेही वाचा, Buldhana Crime News: साडीने गळफास घेत तरुणाने संपवलं आयुष्य; बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील घटना)
अविनाश बागवे यांच्याकडून प्राप्त तक्रारीवरुन गुन्हा दाखल हरोताच पोलिसांनी हा गुन्हा गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडे सोपविण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांच्याकडे या प्रकरणाचा तपास आहे. दरम्यान, भाजप नगरसेवक गणेश बिडकर यांनाही काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीने धमकी दिली होती. आरोपीने बिडकर यांच्याकडे 20 लाख रुपयांची खंडणी मागितली होती.