Buldhana Crime News: साडीने गळफास घेत तरुणाने संपवलं आयुष्य; बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील घटना
Suicide | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील शेगाव (Shegaon) 24 वर्षीय तरुणाच्या आत्महत्येमुळे हादरले आहे. येथील तरुणाने राहत्या घरातील छताच्या पख्याला साडीने गळफास घेत आत्महत्या (Suicide) केली आहे. स्वप्नील पाटील असे तरुणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (3 एप्रिल) दुपारी दोनच्या सुमारास उघडकीस आली. स्वप्नील पाटील याचे मामा रतन सिंग पाटील यांनी शहर पोलिसांना दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप पुढे येऊ शकले नाही.

आत्महत्या केलेल्या स्वप्नील पाटील याचे मामा रतन सिंह पाटील (राहणार वेंकटेश नगर, शेगाव) यांनी पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, माझी बहीण आणि तिचे पती परगावी गेले होते. घरी स्वप्नील एकटाच होता. दरम्यान, त्याचे दोन मित्र धावत माझ्याकडे आले. त्यांनी सांगितले की, आम्ही स्वप्नीलच्या घराचा दरवाजा उघडला तेव्हा स्वप्नील छताच्या पंख्याला साडीने लटकताना दिसला. मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार मी घरी पोहोचलो तर स्वप्नील खरोखरच साडीने पंख्याला लटकताना दिसत होता. (हेही वाचा, Suicide on Facebook Live: सोशल नेटवर्किंग साईटवर लाईव्ह करत नदीत उडी मारुन तरुणांची आत्महत्या)

अधिक माहिती अशी की, स्वप्नील हा आपल्या आई-वडीलांसोबत शेगाव येथील रोकडिया नगर परिसरात राहात होता. त्याचे वडील अनिल पाटील हे खासगी वाहन चालक आहेत. त्यांचा तो सर्वात मोठा मुलगा होता. अनिल पाटील आपली पत्नी आणि लहान मुलगा यांच्यासोबत काही कामानिमित्त परगावी गेले होते. दरम्यान, स्वप्नील याने घरी कोणी नसल्याची संधी साधत आत्महत्या केली. तो अमरावती येथील सुपर हॉस्पीटल परिसरात जनरेटर ऑपरेटरचे काम करत असे.