पुणे: मुलीसोबत फोनवर बोलू देत नसल्याचा राग सासऱ्यांना पडला महागात, जावयाने घेतला गालाचा चावा
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-Getty Images)

सध्या नात्यांमधील भांडणाचा शेवट काय होईल याचा नेम नाही. तर काहीवेळेस भांडणातून हत्या करण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहेत. मात्र पुण्यात (Pune) चक्क मुलीसोबत फोनवर बोलू देत नसल्याचा राग सासऱ्यांना महागात पडला आहे. या कारणावरुन जाववयाने सासऱ्यांच्या गालाचा चावा घेतल्याचा विचित्र प्रकार समोर आला आहे.

खंडू आणि राणी असे विवाहित दांपत्याचे नाव आहे. तर मच्छिंद्र असे सासऱ्यांचे आहे. विवाहित दांपत्य हे हडपसर येथे राहत असून जावई सासऱ्यांना त्यांच्या मुलीसोबत फोनवर बोलण्याची संधी देत नसे. याच कारणावरुन मच्छिंद्र यांनी खंडूच्या या वागण्याचा संताप व्यक्त केला. तसेच खंडू सोबत फोनवरच प्रथम वाद झाले. यानंतर खंडूने सासरे मच्छिंद्र यांना या वादाच्या मुद्द्यावर बोलण्यासाठी घरी बोलावले.

सासरे आणि सासु घरी आल्यावर आमच्या मुलीसोबत तुम्ही का बोलायला देत नाही असा जाब खंडूला विचारण्यात आला. तेव्हासुद्धा सासरे आणि खंडू यांच्यामध्ये वाद झाले. या वादामध्ये अधिक संतप्त होऊन खंडूने चक्क सासऱ्यांच्या गालाचा चावा घेतल्याचा प्रकार घडला आहे.(विरार: घरच्याच सुनेवर वाईट नजर ठेवणाऱ्या 50 वर्षीय सासऱ्याला पोलिसांकडून अटक)

या प्रकारामुळे सासरे जखमी झाले असून खंडू विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर खंडूने सासु आणि पत्नीने या मुद्द्यावरुन मारहाण केल्याचे पोलिसांना सांगितले आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपासणी केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.