विरार: घरच्याच सुनेवर वाईट नजर ठेवणाऱ्या 50 वर्षीय सासऱ्याला पोलिसांकडून अटक
Representational Image | (Photo Credits: PTI)

घरच्याच सुनेवर वाईट नजर ठेवणाऱ्या एका 50 वर्षीय वृद्ध सासऱ्याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तर पीडित महिलेने सासऱ्यांच्या अशा वागण्याची तक्रार नवऱ्याकडे सुद्धा केली होती. मात्र त्यावेळी बायकोच्या बोलण्याकडे नवऱ्याने कानाडोळा केला होता.

मिड डे यांनी दिलेल्या वृत्तानुसार, विरार येथे ही घटना घडली आहे. पीडित महिलेवर घरातील सासरा वाईट नजरेने तिच्याकडे पाहत असे. तसेच स्वयंपाक घरात असताना तिच्यासोबत वाईट चाळे करण्याचा ही प्रयत्न सासऱ्याने केला होता. याबद्दल घरातील अन्य मंडळींना सांगूनसुद्धा लक्ष न दिल्याने महिलेने सासऱ्याला अद्दल घडवण्याचे ठरविले. सासरा पुन्हा एकदा महिलेचा विनयभंग करण्यासाठी आला असता तिने सुरु ठेवलेल्या मोबाईलमध्ये त्याच्या कृत्याचे चित्रीकरण झाले.(Dr. Payal Tadvi Suicide Case: पायल तडवी आत्महत्या प्रकरणी आरोपींना तूर्तास जामीन नाही, मुंबई हायकोर्टाची सुनावणी पुढील आठवड्यात)

या प्रकारानंतर बायकोने नवऱ्याला सासऱ्याच्या कतृत्वाचा व्हिडिओ दाखवत त्याचा भांडाफोड केला. मुलाने यावरुन वडिलांना विचारले असता तु आणि बायकोने घर सोडून निघून जा अशी धमकी दिली असल्याचे पोलिसांना सांगितले. तक महिलेने सासऱ्याच्या विरोधात तक्रार दाखल केली असून त्याला अटक करण्यात आली आहे.