कोरोना व्हायरसचा (Coronavirus) संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पेट्रोल-डिझेल पंपांनी (Petrol Diesel Pumps) वाहनांना पुरवण्यात येणारा इंधन पुरवठा (Fuel Supply) थांबवावा, अशा सुचना पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम (Naval Kishore Ram) यांनी दिल्या आहे. केवळ आपत्कालीन किंवा अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनाचं पेट्रोल पंपांवर इंधन भरण्याची परवानगी देण्यात येणार आहे, असंही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात लॉकडाऊन असतानाही लोक रस्त्यावर येत आहेत. मुंबई-पुण्यातून नागरिक गावाकडे धाव घेत आहेत. त्यामुळे रस्त्यांवरील रहदारी वाढली आहे. तसेच पेट्रोल पंपावरील गर्दीही वाढत आहे. त्यामुळे पुणे शहरासह जिल्ह्यात सर्वसामान्यांना पेट्रोल-डिझेल विक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (हेही वाचा - लोक सांगूनदेखील रस्त्यावर उतरत असतील तर पोलिसांना ‘पोलिसी खाक्या’ दाखवण्याशिवाय पर्याय नाही; अनिल देशमुख देशमुख यांचा इशारा)
Maharashtra: Pune District Collector has instructed all petrol/diesel pumps of the district to stop providing petrol/diesel to the vehicles in the district. Only those involved in emergency/essential services should be allowed to fill fuel at petrol pumps. #COVID19
— ANI (@ANI) March 24, 2020
सध्या संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने दहशत माजवली आहे. भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 450 हून अधिक झाली आहे. तसेच महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 107 वर पोहचली आहे. राज्यात आज 6 नवीन रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यातील 5 रुग्ण हे मुंबईमधील असून 1 रुग्ण अहमदनगरचा आहे.