Pune Crime News: राज्यात राजकिय भुकंप झाल्यानंतर जेजुरीत राजकिय नेत्याची कोयत्याने हत्या केल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. जेजुरी येथील पुरंदर तालुक्यातील मेहबुब पानसारे यांच्यी कोयता आणि कुऱ्हाडीचा वार केल्याने त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेने संपुर्ण ग्रामस्थांना धक्का लागला आहे. जेजुरी पोलीस ठाण्यात उशीरा पर्यंत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाच आरोपींचा समावेश असल्याचे समोर आले आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, जेजुरी येथील राष्ट्रवादी कॉग्रेसच्या माजी नगरसेवक मेहबुब यांनी जमिन खरेदी केली होती. याच कारणांवरून त्यांच्या वाद सुरु झाले. नाझरे धरणाच्या परिसरात जमिन घेतली होती. जमिनीच्या कामासाठी बाहेर निघाले असतना, शुक्रवारी धालेवाडीत गेले असताना अज्ञान पाच ते सहा लोकांनी येवून त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. पानसारे रक्त बंमबाळ झाले आणि जमिनीवर कोसळले. आरोपींनी तेथून पळ काढला, स्थानिकांनी पानसारे यांना रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. आणि उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांंगितले.
पोलीसांनी या प्रकरणात पाच जणांना ताब्यात घेतले आहे. वनेश प्रल्हाद परदेशी, किरण वनेश परदेशी, स्वामी वनेश परदेशी यांच्यावर संशयित म्हणून गुन्हा दाखल केला आहे. नाझरे परिसरात पानसरे यांची शेती आहे. त्यांच्या शेतात मशागतीचे काम.सुरू होते.दरम्यान त्यांचे वाद सुरुच होते. वाद इतके वाढले की, परदेशी कुटुंबीयांनी पानसारे यांचा जीव घेतला. ग्रामस्थांनी पानसारे गेल्याचे दुख व्यक्त केले आहे. पोलीस या संदर्भात तपास करत आहे.