Pune PC Twitter

Pune Crime:  सरत्या वर्षात पुण्यातील (Pune) एका ज्वेलरी दुकानातून 3 कोटी रुपयांचे साेन्याचे दागिने चोरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना रविवार पेठ परिसरात घडली आहे. चोरीची घटना ३१ डिसेंबरच्या रात्री घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेनंतर ज्वेलर्स दुकानाच्या मालकाने पोलिस ठाण्यात सोमवारी फिर्याद दिली.फरासखान पोलिस ठाण्यात या घटने अंतर्गत तक्रार नोंदवला गेला आहे. (हेही वाचा- दिवाळीत 12 लाखांच्या दागिन्याची चोरी, पोलिसांनी 100 CCTV तपासून केली चोरांना अटक

मिळालेल्या माहितीनुसार, 31 डिसेंबरच्या मध्यरात्री रविवार पेठात सोन्याच्या दुकानात चोर झाली. यामध्ये चोरट्यांने 3 कोटी रुपयांचे दागिने चोरल्याचे समोर आले आहे. अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजचे पुनरावलोकन केल्यावर पोलिसांनी पूर्वीच्या कर्मचाऱ्यावर संशय घेतला आहे. सीसीटीव्हीत दिसल्याप्रमाणे कोणीही जबरस्तीने प्रवेश केला नाही असं दिसून येत आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा चुड्पा यांनी तपशील देताना सांगितले की, "चोरी झालेल्या वस्तूंमध्ये ₹3.03 कोटी किमतीचे सोन्याचे दागिने, 5.3 किलो वजनाचे आणि रोख ₹10 लाख 93 हजारांचा समावेश आहे." अज्ञात व्यक्तीने प्रवेश करण्यासाठी डुप्लिकेट चावी बनवल्याचे दिसते. दुकान. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आमचा तपास सुरु आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.