Pune News: पुण्यातील इंदापूर येथे क्षुल्लक कारणांवरून दोन मजूरांमध्ये भांडण झालं आणि एकाने हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इंदापूर तालुक्यातील बिडशिंग येथे शुक्रवारी ही घटना घडली. शेतमजूराने दुसऱ्या शेतमजूराला कोयत्याने डोक्यावर हल्ला केला. दरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. शुभम लालजी भारतीय असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. हल्ला केल्या नंतर जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,हे दोन्ही शेतमजूर मिलिंद जीवनधर जोशी बारा एकर जमीन होती. यात फिर्यादी निलेश मारूती जांभळकर यांनी ही जमीन वाट्याने करायला घेतलेली आहे. यांच्या शेतीत काम करण्यासाठी किसनकुमार रमेशकुमार कुशवाह, नीरजकुमार लालमनी कुशवाह, मनीष लालमनी कुशवाह आणि शुभम लालजी या ठीकाणी होते.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी नीरजकुमार कुशवाह आणि शुभम भारतीय यांच्यात वाद झाला. दुपारी जेवण बनवण्यावरून वाद झाला. हा वाद उपस्थित निलेश यांनी मिटवला होता.
परंतु रात्री यांच्यात घरात वाद पुन्हा झाला. आणि निलेश यांना जोरात ओरडल्याचा आवाज आला. निलेश धावत वरच्या स्लॅपवर गेला तेव्हा शुभम याच्यावर नीरजकुमार वार करत असल्याचं दिसला. डोक्यावर कोयत्याने मारल्यावर शुभम जखमी झाला. फिर्यादी निलेश यांने इतरांच्या मदतीने जखमीला रुग्णालयात नेलं. रुग्णालयात दाखल झाल्यावर शुभमचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. लवकरच त्याला अटक करण्यात येईल अशी माहिती पोलीसांनी दिली आहे.