एका 65 वर्षीय वृध्दाने विकृतीच्या सगळ्या सीमा पार केल्या आहेत. हल्ली महिला मुली तर सुरक्षित नाहीच पण आता प्राण्यांची सुरक्षेचा मुद्दा देखील चव्हाट्यावर आला आहे. पुरुषी गरजा खरचं एव्हड्या असाव्या का की परिसरातील प्राणी देखील सुरक्षित नाहीत. पुण्यातील (Pune) राजगुरुनगर (Rajguru Nagar) परिसरात कुत्रीवर अनैसर्गिक कृत्य करण्यात आलेत. यापेक्षा विशेष बाब म्हणजे अत्याचार करणाऱ्या नराधमाचे वय 65 वर्ष आहे. भिवसेन धोंडीबा टाकळकर (Bhimsen Takalkar) असे या विकृताचं नाव आहे. हा अत्याचार करतानाचे व्हिडीओ (Video) देखील संबंधित व्यक्तींनी आपल्या मोबाइलमध्ये काढले आहेत. तरी संबंधीत आरोपीला पोलिसांकडून (Police) अटक करण्यात आली आहे.
कुत्र्यावर अत्याचार (Bitch Molest) झाल्याचा घाणेरडा प्रकार कधी ऐकलंय का? पण या वृध्द नराधमाने जे केलं आहे त्यामुळे राजगुरुनगर (Rajguru Nagar) परिसरात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी आयपीसी (IPC) कलम 377 आणि प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा 1960 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने प्राणी मित्रांनी खेड पोलिस स्टेशनमध्ये (Khed Police Station) तक्रार दाखल केली. (हे ही वाचा:- Mumbai Crime: सावधान! पोलिस आयुक्तांचा फोटो वापरुन मेसेजद्वारे मुंबईकरांची फसवणूक)
राहत्या घरात पाळीव कुत्रीस खायचे आमिष दाखवून घरामध्ये घेऊन तिच्यावर अनेकदा अनैसर्गिक अत्याचार केल्याचे शेजाऱ्यांना शंका होती. आरोपी वृद्दावर पाळत ठेवत हा सगळा प्रकारचा स्थानिक युवकांनी मोबाईलमध्ये (mobile) व्हिडिओ (Video) चित्रीकरण केले. तर वृध्दाने कुत्रीवर केलेले अत्याचार सगळ्या पुढे आणलेत. वृध्द नराधमास पोलिसांनी अटक केली असली तरी परिसरातील लोकांकडून आरोपी विरुध्द संतप्त प्रतिक्रीया व्यक्त करण्यात येत आहेत.