गेले अनेक दिवसांपासून पुण्यातील (Pune) बहुचर्चित एरो मॉलच्या उद्घाटनाचा (Aero Mall Inauguration) मुहूर्त काही लागेना. एरो मॉलचा उद्घाटन समारंभ 15 ऑक्टोबर पर्यत होणार होता. पण अखेर आता पुणे विमानतळ (Pune International Airport) प्राधिकरणाकडून एरो मॉलच्या उद्धघाटनाबाबत महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. तरी पुढील १० ते १५ दिवसात सर्वसामान्यांसाठी सुरु होणार असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली आहे. एरो मॉल हे पुणे आंतराष्ट्रय विमानतळाच्या लगत असुन राष्ट्रीयसह आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी हे अत्यंत सोयीचं ठरणार आहे. एरो मॉल बांधण्यास एकूण ₹120 कोटींचा खर्च आला असुन या मॉलमध्ये दुकाने, फूड मॉल आणि कार्यालयीन कामकाजाच्या जागेसह 1,000 कारच्या पार्किंगसाठी जागा आहे. तरी पुण्यातील मॉल्सपैकी एरो मॉल देखील भव्यदिव्य मॉल असणार आहे.
विमानतळावर कार पार्किंगसाठी (Car Parking) कमी जागा असल्याचे सांगत एअरो मॉल (Aero Mall) सुरू होण्यास उशीर झाला असल्याची चर्चा आहे. तर उद्घान समारंभाच्या सतत तारीख पे तारीख झाल्यामुळे प्रवासी प्रशासनावर नाराज आहेत. लोहगाव (Lohegaon) परिसरातील हा सर्वात मोठा मॉल म्हणून या मॉलची वर्णी लागली आहे तरी पुणेकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे. (हे ही वाचा:- Goa Tourism: गोव्यात समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांना दारू पिण्यास सक्त मनाई, गोवा सरकारकडून विशेष नियमावली जारी)
गेले अनेक वर्षांपासून एरो मॉलचं बांधकाम सुरु होत तर पुणेकरही मोठ्या कालावधीपासून या मॉलच्या प्रतिक्षएत होते. मुंबई विमानतळानंतर पुणे विमानतळ हे महाराष्ट्रातील सर्वात बीझी एअरपोर्टस पैकी एक आहे. तरी एरो मॉलच्या या उद्घाटन समारंभानंतर पुण्यातील प्रवाशांसाठी हा मॉल अधिक सोयिस्कर ठरणार आहे.