पुणे: गॅस गिझरच्या वायूमुळे एका शिक्षकाचा बाथरूममध्ये गुदमरून मृत्यू
(संग्रहित प्रतिमा)

अंघोळीच्या बाथरूममधील गॅस गिझरच्या (Gas Geyser) वायूमुळे एका शिक्षकाचा दुर्देवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ही घटना पुणे (Pune) जिल्हा येथील कोथरूड (Kothrud) तालुक्यातील संगम सोसायटीत (Sangam Society) घडली. रामराजे किशोर सकपाळ असे मृत व्यक्तीचे आहे. तसेच त्यांचे आई-वडील बाहेरगावी असल्याने ते घरामध्ये एकटेच राहत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या घरातून दुर्गंध येत असल्याने शेजाऱ्यांरी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमनदलाला पाचारण करुन घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी रामराजे जमीनीवर पडल्याचे आढळले. त्यानंतर त्यांना जवळच्या रूग्णालयात घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.

रामराजे हे खाजगी शिकवणीचे वर्ग घेत असल्याचे माहिती मिळाली आहे. तसेच ते कोथरूड येथील संगम सोसायटी मध्ये राहत होते. मात्र, मंगळवारी सकाळी त्यांच्या बंद घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी कोथरूड पोलिसांना याबाबात माहिती दिली. घटनास्थळी पोलीस पोहचल्यानंतर त्यांनी पाहिले की दरवाजा आतून बंद आहे. यामुळे दरवाजा तोडण्यासाठी पोलिसांनी अग्निशमनदलाला बोलावून घेतले. त्यानंतर अग्निशमनदलाच्या जवानांनी बाथरूमचा दरवाजा तोडला. त्यावेळी रामरामे हे बेशुद्ध अवस्थेत जमीनीवर पडले होते. रामराजे यांना पोलिसांनी ताबोडतोब ससून रूग्णालयात घेऊन गेले. पंरतु, रामराजे यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच अंघोळ करताना गॅस गिझरमधून गॅस गळती झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी सांगितले आहे. हे देखील वाचा- माटुंगा रेल्वे स्थानकाच्या पुलावर दिवसाढवळ्या महिलांची छेडछाड; किळसवाणा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

जानेवारी महिन्यातही गिझरच्या वायूमुळे मुंबई शहरातील बोरीवली परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला आपला जीव गमवावा लागला होता. ही घटना 5 जानेवारी रोजी घडली होती. ध्रुवी गोहिल असे त्या मुलीचे नाव असून ध्रुवी ही अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली असून लवकर बाहेर न आल्याने तिच्या घरचे घाबरले होते. अखेर त्यांनी दरवाजा तोडून पाहिले तेव्हा ध्रुवी बेशुद्ध अवस्थेत खाली पडली होती. दरम्यान, गरम पाणी तिच्या अंगावर सांडल्याने ती भाजली होती. त्यानंतर कुटुंबियांनी तात्काळ तिला जवळील मंगलमूर्ती रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचार दरम्यान ध्रुवीचा मृत्यू झाला होता.