प्रातिनिधिक प्रतिमा (File Image)

हिंजवडी (Hinjewadi) इन्फोसिस (Infosys) कंपनीच्या एका संगणक अभियंत्याने (IT Professional) इमारतीच्या 12 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या (Suicide Jumping Off 12th Floor) केल्याची घटना उघडकीस आली. ही घटना पुणे (Pune) येथील वाकड (Wakad) परिसरात मंगळवारी दुपारी घडली. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील आमदार सुभाष धोते यांचा तो पुतण्या होता. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून आत्महत्येच्या कारणाचा शोध घेतला जात आहे. तसेच या घटनेमुळे आजुबाजूच्या परिसरातील नागरिकांना मोठा धक्का लागला आहे.

प्रसून कुमार झा (वय 28, रा. लॉरेल सोसायटी, वाकड) असे आत्महत्या केलेल्या अभियंत्याचे नाव आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसून हे हिंजवडी येथील इन्फोसिस कंपनीत संगणक अभियंता म्हणून कामाला होते. ते मूळचे बिहार येथील असून मागील काही वर्षांपासून वाकड परिसरात राहत होते. दुपारी दोन वाजताच्या सुमारास त्यांनी इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हलवण्यात आला आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत. हे देखील वाचा- नागपूर: घरगुती कारणावरुन मुलाकडून जन्मदात्या पित्याची निर्घृण हत्या

वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, यांचा विवाह निश्चित झाला होता. त्यातील काही वादातून त्यांनी आत्महत्या केली का? याची पडताळणी वाकड पोलिस करत आहेत.