Murder | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

घरगुती कारणावरून मुलाने आपल्या जन्मदात्या पित्याची निघृण हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना नागपूर (Nagpur) येथील हुडकेश्वर (Hudkeshwar) भागातील विघ्नहर्ता (Vighnaharta) येथे शनिवारी घडली. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले. हुडकेश्वर पोलिसांनी आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाची अधिक चौकशी सुरु आहे. आरोपीचे गेल्या काही दिवसांपूर्वा कोणाशी तरी भांडण झाले होते. या रागातून आरोपी हिंसक झाला आणि शेजाऱ्यांना शिवीगाळ देऊ लागला. त्यामुळे त्याचे वडील त्याची समजूत काढत होते. यावेळी आरोपीने वडिलांना मारहाण करण्यास सुरवात केली. तसेच स्वयपाक घरातील चाकूने वडिलांचा गळा चिरला.

विक्रांत पिल्लेवान असे आरोपीचे नाव आहे. विक्रांत हा एक बॉडी बिल्डर आहे. त्याची स्वत:ची जीम असून तो तेथे प्रशिक्षकही आहे. विक्रांतला स्टेरॉईड आणि प्रोटीन घेण्याची सवय होती. दोन दिवसांपूर्वी त्याचे कुणाशी तरी भांडण झाल्याने मारामारी झाली होती. या मारामारीमुळे त्याच्या डोक्याला मार लागला होता. त्याच्या मित्रांनी काल त्याचे सिटी स्कॅन करुन घेतले होते. ज्यामध्ये त्याचे रिपोर्ट नॉर्मल आले होते. काल घरातील सर्वजण टीव्ही कार्यक्रम बघत असताना विक्रांत अचानक हिंसक झाला. मात्र, त्यावेळी त्याचे वडील विजय पिल्लेवान त्याची समजूत काढू लागले. परंतु, संतापलेल्या विक्रांत विजय यांना मारहाण करायला सुरुवात केली. एवढ्यावर न थांबता विक्रांतने स्वयपाक घरातील चाकूने विजय यांचा गळा चिरला. यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच हुडकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हे देखील वाचा- Coronavirus: कोरोनामुळे तिसऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू; नवी मुंबईत उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीच्या वृत्तात घट झाल्याची समजत होते. मात्र, नागपूर येथे घडलेल्या या धक्कादायक घटनेने सर्वांचेचे लक्ष वेधून घेतले आहे. तसेच या घटनेमुळे आजूबाजुच्या परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.