Accident | Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

शालेय सहलीतून परत असताना राज्य परिवहन बस आणि ट्रॅक्टरमध्ये जोरदार धडक झाली. ही घटना बुधवारी सकाळी पहाटे पुण्यातील (Pune) तळेगाव (Talegaon) येथील दाभाडे गावाजवळ घडली. या अपघातात 15 विद्यार्थी जखमी झाले असून बस वाहनचालकही गंभीर अवस्थेत आहे. जखमी विद्यार्थ्यांना आणि चालकाला तातडीने जवळच्या राज्य शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. शालेय सहलीला गेलेले सर्व विद्यार्थी संगमनेर तालुक्यातील बी.जे. खताल शाळेतील आहेत. रायगड जिल्ह्यातील किनारपट्टी असलेल्या अलिबाग येथील विद्यार्थी शालेय सहलीतून परत येत असताना अपघात घडला.

महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात आज सकाळी पहाटे शालेय बस आणि ट्रकमध्ये जोरदार धडक झाल्याने 15 विद्यार्थी जखमी झाले आहेत. महत्वाचे म्हणजे, बस ही राज्य परिवहन मंडळाची होती. या बसमध्ये 16 विद्यार्थी होते. त्यापैंकी 15 जण जखमी झाले आहेत. याशिवास बस चालकालाही दुखापत झाली आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यांच्यावर योग्य उपचार केले जात आहेत. हे देखील वाचा- एका वर्षात पुणेकरांनी भरला तब्बल 81 कोटी रुपयांचा दंड; कारण वाचून बसेल धक्का

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील किनारपट्टी असलेल्या अलिबाग येथील विद्यार्थी शालेय सहलीतून परत येत होते, असे अधिकाऱ्याने सांगितले. जखमी विद्यार्थ्यांना आणि चालकांना तातडीने जवळच्या राज्य शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. महत्वाचे म्हणजे, या अपघातात मोठा अर्थ टळला आहे.