Sanjay Raut And Narendra Modi (Photo Credit: Facebook)

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशासाठी 20 लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली आहे. नरेंद्र मोदी यांच्या घोषणेवर काँग्रेस आणि इतर पक्षांच्या नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. मात्र, शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नरेंद्र मोदींच्या घोषणेचे स्वागत केले आहे. नरेंद्र मोदींच्या या निर्णयावर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. कोरोना विषाणूमुळे लाखो कामगार मुंबई (Mumbai) सोडून चालले आहेत. मुंबईत त्यांचे पोट भरत नसल्याने ते आपापल्या राज्यात निघून गेले आहेत. यामुळे मुंबईसारख्या शहरांचे महत्त्व टिकवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पंतप्रधानांनी वेगळे आर्थिक पॅकेज दिले पाहिजे,” अशी मागणीही संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

“नरेंद्र मोदींनी देशातील शेतकरी, मजूर, लघू-मध्यम उद्योगांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. देशावर कोरोनाचे मोठे संकट वावरत असताना राजकीय टिका करणे सध्या योग्य नाही. संपूर्ण देशाने पंतप्रधानांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे,” असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. लॉकडाउन चारसंबंधी सर्व मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउन वाढवला जावा, अशी भूमिका मांडली होती असे संजय राऊत यांनी सांगितले आहे. मुंबईतून 20 ते 25 टक्के महसूल देशाच्या तिजोरीत जमा केला जातो. त्यामुळे फक्त मुंबईच नव्हेतर, मुंबईसारख्या इतर शहरांसाठीही आर्थिक पॅकेज देणे गरजेचे आहे असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा- Atma Nirbhar Bharat Abhiyan: लोकल ब्रांड ग्लोबल करण्यावर विशेष लक्ष्य, नागरिकांच्या खात्यात पैसे थेट जमा; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजबाबत माहिती

“विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून मला सहाव्या जागेसाठी ऑफर आली होती, असा दावा दिल्याचा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळात चागंलीच चर्चा रंगली आहे. याबाबत सजंय राऊत यांना प्रश्न विचारला असताना राष्ट्रवादीकडून मिळालेल्या ऑफरची माझ्याकडे काही माहिती नाही, असे संजय राऊत म्हणाले आहेत.