Pune: दोन मुलांची आई असलेल्या Preeti Maske ने केला विश्वविक्रम; सायकलने लेहहून मनालीला पोहोचणारी ठरली जगातील पहिली महिला
Preeti Maske (PC -Twitter)

Pune: जगात दररोज नव-नवीन रेकॉर्ड बनवले जातात. रेकॉर्ड करणाऱ्यांना कठोर परिश्रम करावे लागतात. पुण्यातील प्रीती मस्के (Preeti Maske) हिनेही नवा विश्वविक्रम केला आहे. पुण्यातील दोन मुलांची आई असलेल्या प्रीती मस्के हिने लेह (Leh) ते मनाली (Manali) असा सायकलने प्रवास केला आहे. हा प्रवास तिने 55 तास 13 मिनिटांत पूर्ण केला असून हा नवा विश्वविक्रम आहे. अशी कामगिरी करणारी प्रीती ही जगातील पहिली महिला ठरली आहे. जिने हा किताब पटकावला आहे. हा विक्रम करण्यासाठी प्रीतीने 430 किमीचे अंतर सायकलने कापले. प्रितीचे अभिनंदन करतानाचा (BRO- Bharat Roads Organisation) ने ट्विटरवर एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये प्रीतीच्या लेह ते मनाली या प्रवासाच्या अनेक वेगवेगळ्या क्लिप आहेत.

व्हिडिओसोबत BRO ने इंग्रजीमध्ये एक कॅप्शन देखील दिले आहे ज्यात लिहिलं आहे, "अभिनंदन सुश्री प्रीती मस्के. हा एक गिनीज रेकॉर्ड आहे. या प्रवासासाठी तिला केवळ 55 तास 13 मिनिटे लागले. तिने लेह ते मनालीपर्यंत 430 किमी सायकल चालवली. कमी ऑक्सिजनची उपलब्धता असलेल्या उच्च उंचीच्या प्रदेशात अल्ट्रा सायकलिंगचा प्रयत्न तिच्या जिद्द आणि दृढनिश्चयाचे प्रमाण सांगतो." (हेही वाचा - Marathwada Pandharpur Special Train: मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी! आषाढी वारीनिमित्त मध्य रेल्वेकडून मराठवाडा-पंढरपूर विशेष गाड्या)

प्रीती मस्के या 45 वर्षांच्या आहेत. हा विक्रम करून प्रीतीने हे सिद्ध केले की, आवड खरी असेल तर वयाचा काही फरक पडत नाही. वास्तविक, अतिशय उंच प्रदेश असलेल्या या भागात सायकलने एवढा लांबचा प्रवास करणे सोपे नाही. या भागात जास्त उंची असल्याने ऑक्सिजन कमी असल्याने श्वास घेण्यास त्रास होण्यासारख्या समस्याही निर्माण होतात. तसेच येथील रस्तेही सर्वात कठीण मार्गांपैकी एक आहेत.

लेहच्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे मुख्य अभियंता ब्रिगेडियर गौरव कार्की यांनी 22 जून रोजी सकाळी 6 वाजता प्रीतीला हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर प्रीती मनालीला रवाना झाली. त्यानंतर 24 जून रोजी दुपारी 1.13 वाजता प्रीती मस्के मनालीला पोहोचली. प्रवासादरम्यान प्रीतीला हाय पासवर दम लागल्याने ऑक्सिजनचा वापर करावा लागला.