Prakash Mahajan (PC - You Tube)

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे मामा आणि दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजन (Prakash Mahajan) पुन्हा एकदा मनसेत (Maharashtra Navnirman Sena) प्रवेश करणार आहेत. प्रकाश महाजन यांना 2009 मध्ये मनसे पक्षातून निलंबित करण्यात आलं होतं. त्यानंतर प्रकाश महाजन यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. परंतु, 2011 मध्ये महाजन यांनी शिवलेनेला रामराम ठोकला. मात्र आता तब्बल 10 वर्षांनंतर प्रकाश महाजन यांनी मनसेत प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे.

प्रकाश महाजन आणि शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज कुष्णकुंजवर जावून मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. प्रकाश महाजन आणि हर्षवर्धन जाधव दोघेही मनसेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. येत्या 23 जानेवारीला मनलेचे मुंबईमध्ये महाअधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनामध्ये पक्षाचे ध्येय-धोरण जाहीर करण्यात येणार आहे. तसेच मनसेच्या झेंड्याचा रंगही बदण्यात येणार आहे. या सर्व बदलावरून मनसे पक्षाची हिंदुत्वाकडे वाटचाल होत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. (हेही वाचा - महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या मोबाईल लिंकमध्ये व्हायरस; लिंक उघडल्यावर सुरू होतो कँडीक्रश गेम)

हर्षवर्धन जाधव हे याआधी मनसेच्या तिकीटावर आमदारपदी निवडून आले होते. पुढील आठवड्यात होणाऱ्या मनसेच्या महाअधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. हर्षवर्धन पाटीलही मनसेमध्ये पुनरागमन करणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 'राज ठाकरे यांनी हिंदुत्व स्वीकारलं आहे. राज ठाकरे यांनी जी भूमिका घेतील ती स्वागतार्ह असेल. राज ठाकरे यांचा हिंदुत्वाचा मुद्दा पटला म्हणून मला राज ठाकरे यांच्यासोबत काम करायचं आहे,' अशी इच्छा प्रकाश महाजन यांनी व्यक्त केली आहे.