Prakash Ambedkar To Support Congress in MVA: लोकसभा निवडणूकीच्या रणधुमाळीत 'वंचित' मविआ ला नव्हे तर केवळ कॉंग्रेसला 7 जागांवर मदत करणार !
Prakash Ambedkar (Photo Credit _ Twitter)

भारतामध्ये यंदा लोकसभा निवडणूका 7 टप्प्यामध्ये होणार आहेत. या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर युत्या, आघाड्यांची गणितं जुळवत उमेदवार याद्या जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रातही भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधकांनी एकत्र येत इंडिया आघाडी बनवली आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार यांचा पक्ष आणि कॉंग्रेस पक्षाची महाविकास आघाडी असताना त्यामध्ये प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचा वंचित एंट्री करण्याचा प्रयत्न करत होता मात्र शेवटच्या टप्प्यात आता बोलणी फिस्कटल्याची चिन्हं आहेत. आज कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहित त्यांनी उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्या पक्षाकडून आपल्याला महाविकास आघाडीच्या बैठकीत डावलण्यात आल्याचं सांगत त्यांनी त्याबद्दल उघड नाराजी बोलून दाखवताना महाराष्ट्रात वंचित कॉंग्रेसला 7 जागांवर मदत करण्यासाठी तयार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

मविआ मध्ये आता कॉंग्रेसला मिळालेल्या 7 जागांची माहिती द्यावी त्या ठिकाणी आपण पक्षाला सारी मदत करू अशी माहिती दिली आहे. या पत्रातच त्यांनी भारत जोडो न्याय यात्रा च्या शिवाजी पार्क वर झालेल्या समारोह सोहळ्याला बोलवल्या प्रकरणी आभार व्यक्त केले आहेत. Lok Sabha Elections 2024: 'मनोज जरांगे यांना जालना मधून उमेदवारी द्या'; वंचित कडून 'मविआ' ला 4 मोठे प्रस्ताव .

पहा प्रकाश आंबेडकर यांचे पत्र

वंचित बहुजन आघाडीचा मुख्य अजेंडा म्हणजे भाजपा-आरएसएस सरकारला सत्तेतून बेदखल करणे. हे लक्षात घेऊन मी महाराष्ट्रातील 7 जागांवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला VBA चा पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे." असं म्हटलं आहे. दरम्यान आज उशिरा आता मविआ कडून त्यांची उमेदवार यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान महाराष्ट्रात 5 टप्प्यामध्ये मतदान होणार आहे.