पुण्याच्या (Pune) कल्याणी नगर (Kalyani Nagar) मध्ये एका बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने लक्झरी कारने दोन जणांना चिरडल्याच्या घटनेने मोठा संताप व्यक्त केला जात आहे. अल्पवयीन मुलाच्या दारूच्या नशेत गाडी चालवून दोन जणांचा बळी घेतल्याच्या घटनेवर पोलिस आणि न्यायव्यवस्थेमधून घेण्यात आलेले निर्णय रोष वाढवणारे ठरल्यानंतर आता जनसामान्यांमधून आवाज पुकारला जात आहे. या घटनेवर आमदार आणि एनसीपी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नीनेही केलेलं ट्वीट चर्चेमध्ये आले आहे. पुण्यात अपघातावर ट्वीट करताना त्यांनी 'या प्रकरणातील एक मुलगा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता. त्यावेळी त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला. आजही त्या घटनांचा वाईट परिणाम माझ्या मुलाच्या मनावर आहे. या मुलांच्या त्रासाला कंटाळूनच शाळा बदलावी लागल्याचंही त्यांनी ट्वीट मध्ये नमूद केले आहे.
सध्या या प्रकरणामध्ये आरोपी मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांना पोलिसांनी अटक केली आहे. अग्रवाल कुटुंबीयांना पोलिसांचा वरदहस्त असल्याची भावना जनसामान्यांमध्ये आहे. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी देखील कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.
प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नीचं ट्वीट
मात्र योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी या मुलांच्या त्रासाला कंटाळून त्याची शाळा बदलावी लागली. त्या घटनांचा वाईट परिणाम आजही त्याच्या मनावर आहे. वाईट प्रवृत्ती असणाऱ्या मुलांची दखल वेळीच घेतली गेली असती तर असा भयंकर गुन्हा कदाचित घडला नसता.
— Sonali Tanpure (@TanpureSonali) May 21, 2024
आरोपी मुलाची हमी देण्यासाठी आलेल्या त्याच्या आजोबांचे म्हणजे सुरेंद्र अग्रवाल यांचे संबंध छोटा राजनशी असल्याचं समोर आलं आहे. 2007-08 च्या एका प्रकरणाशी त्यांचा हा संबंध आहे. मुंबई सत्र न्यायालयात छोटा राजनशी संबंधित सर्व प्रकरणं सीबीआयकडे हस्तक्षेप करण्यात आली होती. त्यामध्ये या प्रकरणाचा समावेश असल्याची माहिती आता समोर आली आहे.