Ajit Pawar | (Photo Credits: Facebook)

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण ( Pooja Chavan Suicide Case) आणि त्यात वनमंत्री संजय राऊत यांचा होणारा उल्लेख यावरुन महाविकासआघाडी सरकार चांगलेच अडचणीत आले आहे. त्यात वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathore ) हे कोणाच्याही संपर्कात नाहीत. त्यामुळे चर्चेला अधिकच उधान आले आहे. महाविकासआघाडी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनाही या प्रकरणावरुन आज (17 फेब्रुवारी) प्रसारमाध्यमांनी विचारणा केली. यावर अजित पवार म्हणाले. ते नॉट रिचेबल असले तरी आमच्या संपर्कात आहेत. गायब नाहीत. येत्या गुरुवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलतील अशी महिती आहे.

दरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलताना त्या मुलीच्या वडीलांनी आम्हाला कर्ज होतं. त्यामुळे ती टेन्शनमध्ये असायची असे म्हटले होते. त्यामुळे या प्रकरणात आणखी काही मुद्दे पुढे येत आहेत. एकाला ताब्यात घेण्यात आले असून आणखी एकदोघांना ताब्यात घेतले जाण्याची शक्यता आहे. पोलीस त्यांचं काम करत आहेत. पण एखाद्या प्रकरणात मोठ्या व्यक्तीचे नाव आले की त्याची चर्चा होते. प्रसिद्धी दिली जाते. पणकाही असले तरी चौशीनंतरच सत्य बाहेर येईल. (हेही वाचा, Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी वानवडी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं; चौकशी सुरू)

या वेळी अजित पवार यांनी संजय राठोड यांची पाठराखण केली. ते म्हणाले आताच्या घडीला ती व्यक्ती निराधार आहे. हे वास्तव आहे. या आधी धनंजय मुंडे यांच्याबबतही असेच घडले. सुरुवातील खूप चर्चा झाली. राजीनामा मागण्यात आला. नंतर त्या आरोप करणाऱ्या व्यक्तीनेच आपली तक्रार मागे घेतली. त्या वेळी जर त्यांचा राजीनामा घेतला असता तर ते अत्यंत चुकीचे झाले असते, असेही अजित पवार म्हटले.

कोणत्याही प्रकरणात केवळ आरोप झाले म्हणून कोणत्याही व्यक्तीला पदावरुन हटवणे योग्य नाही. जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोवर कोणत्याही व्यक्तीला दोषी धरता येऊ शकत नाही. ते शिवसेना नेते आहेत. त्याुमळे त्यांच्याबाबत काय निर्णय घ्यायचा हे पक्षाने ठरवायचं. पण, एक त्रयस्त व्यक्ती म्हणून माझं हे मत आहे, असेही अजित पवार यांनी म्हटले.