घाटकोपर: आगोदर सापडले महिलेचे धड मग पाय, मुंबई पोलीस बेवारस मृतदेहाच्या शिराच्या शोधात
Legs | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

मुंबई (Mumbai) शहरातील घाटकोपर परिसराती एका घटनेने पोलीसही चक्रावले आहेत. घाटकोपर (Ghatkopar) परिसरात शिर नसलेल्या आवस्थेत एका महिलेचे बेवारस धड मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मंगळवारी (31 डिसेंबर 2019) सापडले होते. त्यानंतर त्याच दिवशी याच परिसरात धडापासून वेगळे करण्यात आलेले पाय पोलिसांना कुर्ला (Kurla) परिसरात आढळून आले. त्यामुळे अज्ञात व्यक्तिने महिलेची हत्या केल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलीस आले असून, आता धडापासून पाय वेगळे करण्यात आलेल्या शरीराचे शिर मुंबई पोलीस शोधत आहेत.

प्राप्त माहितीनुसार, विद्याविहार एसटी डेपोजवळील किरोळ रोड पदपथावर एका महिलेचे धड चादरीत गुंडाळलेल्या अवस्थेत सापडले. शिर नसलेले हे धड ताब्यात घेत पोलिसांनी तपास सुरु केला. अशा पद्धतीने धड आडळून आल्याने एकच खळबळ उडाली. सापडलेले धड हे साधारण 30 ते 35 या वयोगटांतील महिलेचे असावे असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. (हेही वाचा, पुणे: पतीकडून पत्नीवर भररस्त्यात वार, मूल होत नसल्याच्या रागातून कृत्य)

पीटीआय ट्विट

दरम्यान, धडाला शिर नसल्यामुळे हा मृतदेह नेमका कोणाचा याबाबत गूढ अद्याप कायम आहे. अज्ञात व्यक्तींनी महिलेची हत्या केली असावी तसेच, मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी धडापासून शिर वेगळे करण्या आले असावे असा अंदाज आहे. दरम्यान, सापडलेला शिर नसलेला मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला आहे. त्यामुळे मृत व्यक्तीची हत्या दोन ते तीन दिवसांपूर्वी करण्यात आली असावी असा पोलिसांचा प्राथमिक कयास आहे. घाटकोपर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.