करोना व्हायरचा (Coronavirus) प्रसार थांबवण्यासाठी शुक्रवारी मध्यरात्रीपासून नागपूर (Nagpur) शहरात लॉकडाऊन (Lockdown) म्हणजे जीवनावश्यक सेवा वगळता सर्व सेवांवर बंदी करण्यात आले होती. या काळात नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर न पडता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्यालयातील पत्रकार परिषदेत केले होते. सध्या कोरोना बाधीत लोकांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होत आहे. मात्र, काही ठिकाणी लॉकडाऊनकडे दुर्लक्ष करत असल्याची माहिती समोर आली आहे. यातच नागपूर येथे पहिल्याच दिवशी लॉकडाऊनला सहकार्य न करणाऱ्या 348 जणांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती शहर पोलीस आयुक्त, बी.के उपाध्याय (BK Upadhyay) यांनी दिली आहे.
करोना व्हायरसचा प्रसार संसर्गातून होत असल्याने प्रशासनाने सुरुवातीला गर्दी होणारी ठिकाणे बंद केली होती. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून शहरात 144 कलम लागू करण्यात आले. मात्र त्यानंतरही सार्वजनिक ठिकाणी होणारी वर्दळ अपेक्षेइतकी कमी होत नसल्याने राज्यशासनाने मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड सह नागपुरातही शुक्रवारी मध्यरात्रीपासून ‘लॉकडाऊन’सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या सेवा आणि सुविधांचा अपवाद सोडला तर, सर्व सेवा बंद केल्या जातील. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नितीन राऊत यांनी केले होते. परंतु नागपूर शहरात अद्यापही नागरिकांना घराबाहेर पडणे बंद केले नसल्याचे समजत आहे. प्रशासनाकडून अशा 348 नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. कोरोना व्हायसरने संपूर्ण जगात थैमान घातला आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्चला जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे. जनता कर्फ्यू दरम्यान सकाळी 7 ते रात्री 9 या दरम्यान नागरिकांना घरबाहेर पडू नका, असे सांगण्यात आले आहे. जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने देखील अनेक एक्सप्रेस रेल्वे रद्द केल्या आहेत. हे देखील वाचा- अकोला जिल्ह्यात उद्यापासून सलग 3 दिवस 'Lockdown', कोविड-19 चा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय
एएनआयचे ट्वीट-
BK Upadhyay, City Police Commissioner, Nagpur: Police has taken action against 348 people who flouted the direction of the administration on the first day of the lockdown. #Coronavirus
— ANI (@ANI) March 21, 2020
करोना व्हायरसमुळे मोठ्या प्रमाणावर लोक दगावत असल्याने इटलीत लॉक डाऊन करण्यात आले. लोकांना घरातच ठेवण्यात आले. इतकच नव्हे तर बाहेरून दरवाजेही बंद करण्यात आले. नागरिकांनी इतर नागरिकांच्या संपर्कात येऊ नये आणि आजार फैलावू नये, यासाठी ही खबरदारी घेण्यात आली. इटलीत अन्न आणि औषध खरेदी, रुग्णालय, बँक किंवा बालक आणि वृद्धांची काळजी घेण्यासाठी घर सोडण्याची मुभा देण्यात आली आहे. त्या आधी चीनच्या वुहान शहरातही लॉक डाऊन करण्यात आले होते. चीनमध्ये करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढल्याने लोकांनीच स्वत: घराबाहेर पडणे टाळले होते.