
लॉकडाऊनच्या काळात अनेकांचं शिक्षण अर्धवट राहिलं आहे. नोकर्या गेल्या आहेत. पण आता पुणे महानगर पालिकेकडून वैद्यकीय कर्मचार्यांच्या अनेक पदांवर भरती सुरू आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, आयाबाई, एएनएम अशा पदांचा समावेश आहे. पीएमसीच्या (PMC) या भरती 2021 मध्ये 400 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत तर यासाठी इच्छुक उमेदवार 2 एप्रिल पर्यंत अर्ज दाखल करू शकणार आहेत. दरम्यान प्रत्येक पदासाठी पात्रता निकष, वेतन वेगवेगळे आहे त्यामुळे तुम्हांला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्याची माहिती नीट, संपूर्ण वाचून वेळीच करायला विसरू नका. Konkan Railway Recruitment 2021: कोकण रेल्वेत ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट पदासाठी नोकर भरती, जाणून घ्या अधिक.
विविध पदांसाठी इच्छुक उमेदवाराला 2 एप्रिल 2021 पर्यंत किंवा त्याआधी विहित नमुन्यात अर्ज करणं आवश्यक आहे. संबंधित अर्ज पीएमसी भवनाच्या पत्त्यावर पाठवायचा आहे. इथे पहा अधिकृत नोटिफिकेशन.
विविध पदानुसार वेतन
मेडिकल ऑफिसर (MBBS) - 60,000 रुपये
मेडिकल ऑफिसर (BAMS) - 40,000 रुपये
नर्सिंग ऑर्डर्ली - 16,400 रुपये
एएनएम (ANM) - 18,400 रुपये
आया - 16,400 रुपये
दरम्यान आया साठी अर्ज करणार्यांना किमान 8 वी पास शिक्षण आवश्यक आहे तर वैद्यकीय अधिकारी साठी एमबीबीएस, बीए.एम.एस शिक्षण आवश्यक आहे. यामध्ये कामाचा अनुभव असणार्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. तर वय खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी 38 पेक्षा अधिक नसावं. आरक्षित वर्गातील उमेदवाराला वयोमर्यादेमध्ये त्यानुसार शिथिलता मिळणार आहे.
सध्या पुण्यात पुन्हा कोरोनारूग्णाचा आकडा वाढला आहे त्यामुळे बंद करण्यात आलेली जम्बो फॅसिलिटी सेंटर्स पुन्हा सुरू केली जाणार आहेत. इतर आरोग्यसेवांसोबत आता वैद्यकीय कर्मचार्यांवर कोविड 19 साठी तसेच कोविड 19 लसीकरणासाठी देखील कर्मचार्यांवर ताण आहे. त्यामुळे पुन्हा तात्पुरत्या काळासाठी पीएमसीकडून नोकरभरती केली जात आहे.