रेल्वे मंत्रालयाच्या अधीन सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच केआरसीएल मध्ये ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट पदासाठीच्या नोकर भरती संदर्भातील जाहीरात झळकवली आहे. कंपनीने 10 मार्चला भरती जाहीरातीनुसार, उधमपुर-श्रीनगर-बारामुला-रेल लिंक प्रोजेक्ट, जम्मू आणि कश्मीर संबंधिक कामांसाठी ज्युनिअर टेक्निकल असिस्टंटच्या पदांसाठी संविदाच्या आधारावर भरतीसाठी 20 ते 23 एप्रिल पर्यंत वॉक इन इंटरव्यूचे आयोजन केले जाणार आहे. अर्ज करण्याऱ्या उमेदवारांनी केआरसीएलची अधिकृत वेबसाइट konkanrailway.com येथे उपलब्ध असलेल्या अॅप्लीकेशन फॉर्मसह इंटरव्युमध्ये सहभागी होऊ शकता.
कोकण रेल्वेने जाहीर केलेल्या जाहीरातीनुसार ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटी किंवा महाविद्यालातून इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन/कम्युनिकेशन/इस्ट्रुमेंट मध्ये कमीतकमी 50 टक्क्यांनी इंजिनिअरिंग डिग्री उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.(BOI Recruitment 2021: बँक ऑफ इंडियामध्ये नोकर भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रियेबद्दल अधिक)
वॉक इन इंटरव्यूमध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांना आपल्यासोबत कोकण रेल्वे द्वारे उपलब्ध करुन दिल्या गेलेल्या अॅप्लिकेशन फॉर्म पूर्णपणे भरुन घेऊन यावा लागणार आहे. आपले प्रमाण पत्रांची मुळ प्रति सुद्धा आणि त्याची एक एक झेरॉक्स सुद्धा आणावी लागणार आहे. उमेदवारांनी सकाळी 9 वाजता ते दुपारी 1 पर्यंतच्या कालावधीत रजिस्ट्रेशन करावे. उमेदवारांना कमीत कमी 2-3 दिवस थांबण्याची व्यवस्था केली जाणार आहे.परंतु कोकोण रेल्वेकडून कोणताही टीए/डीए दिला जाणार नाही आहे.