Representational Image (Photo Credit: PTI)

 Bank of India Recruitment 2021:  जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण बँक ऑफ इंडिया मध्ये ऑफिस असिस्टंट, अटेंडेंट, वॉचमन आणि फॅकल्टीच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. ही नोकरची संधी मात्र कोलकाता झोनल ऑफिस अंतर्गत अॅग्रीकल्चर फायनान्स अॅन्ड फायनान्शिअल अन्क्लूजन डिपार्टमेंट मध्ये रुरल सेल्फ इम्पलॉयमेंट ट्रेनिंग इंस्टिट्युट, बारासातसाठी विभिन्न सपोर्ट स्टाफ भरतीसाठी जाहीरात झळकवण्यात आली आहे.  बँकेकडून जाहीर करण्यात आलेल्या जाहिरातीत आरएसआटीआयच्या आधारावर केली जाणार आहे.

इच्छुक असलेल्या उमेदवारांना बँकेकडून जाहीर करण्यात आलेल्या अर्जाच्या माध्यमातून नोकरीसाठी फॉर्म भरता येणार आहे. अर्ज हा बँकेची अधिकृत वेबसाइट bankofindia.in वर करियर च्या विभागात दिसून येणार आहे. उमेदवारांना अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 मार्च दुपारी 4 वाजेपर्यंत आहे.(Saraswat Bank Recruitment 2021: सारस्वत बॅंक मध्ये 150 कनिष्ठ अधिकार्‍यांची भरती होणार; 19 मार्च पर्यंत saraswatbank.com वर करा ऑनलाईन अर्ज)

उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमधून उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे. त्याचसोबत स्थानिक भाषा येणे सुद्धा महत्वाचे आहे. हिंदी, इंग्रजी सुद्धा उमेदवाराला येणे आवश्यक आहे. तसेच अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 1 जानेवारी 2021 ला 18 वर्षांहून कमी किंवा 25 वर्षाहून अधिक नसले पाहिजे. तर वॉचमन पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेतून 8 वी पास असणे अनिवार्य आहे.

तसेच फॅकल्टी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने सुद्धा कोणत्याही मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटी किंवा उच्च शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कोणत्याही विषयात उत्तम गुण असणे आवश्यक आहे. वोकेशनल कोर्स डिप्लोमा असल्यास उत्तम.  एमएस ऑफिसचे सुद्धा ज्ञान असावे. उमेदवाराचे वय 1 जानेवारी 2021 रोजी 25 वर्षापेक्षा कमी आणि 65 वर्षांहून अधिक नसावे.