पीएमसी बॅंकेवर (PMC Bank) महिन्याभरापूर्वी आरबीआय (RBI Bank) बॅंकेकडून घालण्यात आलेल्या आर्थिक निर्बंधानंतर खातेदारांचा रोष अनावर झाला आहे. आज संतप्त खातेदारांनी मुंबईतील आझाद मैदानावर (Azad Maidan) मोर्चा काढला आहे. मुंबईतील शेकडो पीएमसी बॅंक खातेदार सध्या आझाद मैदानात एकत्र जमले आहेत. खातेदारांनी बॅंके प्रशासनाविरूद्ध आवाज उठवत घोषणाबाजी करायला सुरूवात केली आहे. PMC Bank Crisis ने घेतला 5 वा बळी? भारती सदारंगानी यांचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू.
आरबीयने पीएमसी बॅंकेमधील आर्थिक व्यवहार लक्षात आल्यानंतर कर्ज देणंघेणं, एफडी यांच्यावर निर्बंध घातले आहेत. सध्या पीएमसी बॅंक खातेदार सहा महिन्यात केवळ 40,000 रूपये काढू शकतात. दिवाळी सारखा सण समोर येऊन ठेपला असला तरीही अनेकांचे पैसे अडकल्याने पीएमसी बॅंक खातेदार अडचणींमध्ये आले आहेत. PMC Bank Crisis: पीएमसी बॅंकेचे माजी संचालक एस. सुरजित सिंग अरोरा यांना 24 ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी.
ANI Tweet
Maharashtra: Punjab and Maharashtra Co-operative (PMC) Bank depositors stage a protest at Azad Maidan in Mumbai pic.twitter.com/Z9RRSw2EZF
— ANI (@ANI) October 22, 2019
पीएमसीमध्ये बॅंकेमध्ये पैसे अडकल्याने तणावाखाली आल्याने अत्तापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. राज्यात विधानसभा निवडणूक 2019 पार पडल्यानंतर आचार संहितेचे नियम संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बाबत केंद्र सरकारशी चर्चा करणार असल्याचं आश्वासन त्यांनी बॅंक खातेदारांना दिलं होतं. आता सरकार याबाबत काय निर्णय घेणार याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे.