PMC Bank Crisis: पीएमसी बॅंकेचे माजी संचालक एस. सुरजित सिंग अरोरा यांना 24 ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी
PMC Bank (Photo Credits: IANS)

पंजाब महाराष्ट्र को. ऑप बॅंक आर्थिक गैरव्यवहार (PMC Bank Scam) प्रकरणी मुंबई पोलिसांच्या ताब्यात असणार्‍या माजी संचालकांच्या पोलिस कोठडीमध्ये वाढ करण्यात आली आहे. आज मुंबईमध्ये किला कोर्टात करण्यात आलेल्या सुनावणी दरम्यान पीएमसी बॅंकेचे माजी संचालक एस. सुरजित सिंग अरोरा यांना 24 ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पीएमसी बॅंकेमध्ये 4355 कोटीच्या घोटाळ्यांच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. थॉमस यांना 4 ऑक्टोबर दिवशी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे. त्यांच्यावर हाऊसिंग डेव्हलपमेंट इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेडला दिलेलं कर्ज RBI पासून लपवण्यात आल्याचे आरोप लावण्यात आले आहेत. PMC Bank Crisis ने घेतला 5 वा बळी? भारती सदारंगानी यांचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू.

पीएमसीकडून एचडीआयएलला कर्ज देण्यात आले होते, मात्र एचडीआयएलने कर्जाची रक्कम वेळेत न भरल्याने पीएमसी बँक आणि बँकेतील खातेदार आता अडचणीत आले आहेत.बँकेला 4355.43 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याबद्दल हा एफआयआर नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी HDIL प्रमोटर्स वधावान पिता-पुत्र देखील अटकेत आहेत.

ANI Tweet

आरबीआय बॅंकेकडून पीएमसी बॅंकेवर निर्बंध घालण्यात आल्याने खातेदार आता सहा महिन्यांमध्ये केवळ 40,000 रूपये काढू शकतात. आज पीएमसी बॅंक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून अजय मिसार यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.