PMC Bank Crisis ने घेतला 5 वा बळी? भारती सदारंगानी यांचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
PMC Bank (Photo Credits: Twitter)

RBI च्या आर्थिक निर्बंधांनंतर अडचणीमध्ये आलेल्या पंजाब महाराष्ट्र को. ऑप बॅंकेच्या खातेदारांसमोर आता एक एक दिवस ढकलणं कठीण होत चालले आहे. रविवार (20 ऑक्टोबर) च्या रात्री 73 वर्षीय भारती सरदंगानी (Bharati Sadarangani) या वृद्ध महिलेचा हार्ट अटॅकच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारती यांच्या मुलीचं आणि जावयाचं बॅंक अकाऊंट पीएमसी बॅंकेमध्ये होते. त्यांच्या कुटुंबाच्या भविष्याच्या टेन्शनमुळे तणावाखाली असलेल्या भारती यांचा रविवारी रात्री मृत्यू झाला.

प्राप्त माहितीनुसार भारती यांच्या मुलीचे आणि जावयाचे पीएमसी बॅंकेमध्ये सुमारे अडीच कोटी रूपये होते. आरबीआयने पीएमसी बॅंकेवर आर्थिक निर्बंध घातल्याने खातेदारांना सहा महिन्यांसाठी कमाल 40,000 रूपये काढता येणार आहेत. यापूर्वी पीएमसी बॅंकेत पैसे अडकल्याने चार जणांच्या राज्यात विविध ठिकाणी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. PMC बँक घोटाळाप्रकरणी राकेश-सारंग वधवान, वायराम सिंग यांना 23 ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडी, किला कोर्टाचा निर्णय.

टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना भारती यांचा जावई यांनी त्या तणावाखाली असल्याची चर्चा त्यांच्या आईशी झाल्याची माहिती दिली आहे. तसेच भारती यांना कोणताही आजार नव्हता. मागील काही दिवसांपासून तणावाखाली असलेल्या भारती यांचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू झाला आहे. यापूर्वी संजय गुलाटी, निवेदिता बिजलानी, मुरलीधर धर, फट्टो पंजाबी या खातेधारकांचा मृत्यू झाला आहे.