पंजाब महाराष्ट्र बँक (PMC) घोटाळाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी राकेश- सारंग वधवान यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली होती. त्यानुसार त्यांनै 16 ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. आता पुन्हा त्यांच्या शिक्षेत वाढ करण्यात आली असून येत्या 23 ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याचा निर्णय किला कोर्टाने जाहीर केला आहे. वाधवान पितापुत्र हे एचडीआयएलचे (HDIL) प्रमोटर आहेत.गेल्या तीन-चार दिवसांपूर्वी बँकेचे संचालक राकेश आणि सारंग वधवान यांच्याकडे 2100 एकरपेक्षा अधिक जमीन असल्याचा सुगावा ईडीला लागला आहे. ही जमीन वसई-पालघर मधील सात विविध गावात असल्याचे सांगण्यात येत आहे. तर आता या जमीनीवर जप्ती आणण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाच्या अनुसार, या संपत्तीची एकूण किंमत तब्बल 3500 कोट्यावधी रुपये आहे.
पीएमसीकडून एचडीआयएलला कर्ज देण्यात आले होते, मात्र एचडीआयएलने कर्जाची रक्कम वेळेत न भरल्याने पीएमसी बँक आणि बँकेतील खातेदार आता अडचणीत आले आहेत.बँकेला 4355.43 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याबद्दल हा एफआयआर नोंदविण्यात आला आहे.(PMC Bank Crisis: राकेश वधावन, सारंग वधावन, वायराम सिंग यांना 16 ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी)
ANI Tweet:
Maharashtra: Accused in PMC Bank case, Rakesh Wadhawan, Sarang Wadhawan and Waryam Singh have been sent to judicial custody till 23rd October by Esplanade Court, Mumbai. https://t.co/DM4zwKnPyA
— ANI (@ANI) October 16, 2019
तर पीएसमी बँक घोटाळाप्रकरणानंतर आता खातेदार आरोपी संचालकांच्या विरोधात संताप व्यक्त करत आहेत. तसेच गेल्या दोन दिवसांपासून बँक खातेधारकांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर येत आहेत. दरम्यान, आरबीआयने आर्थिक निर्बंध घातल्याने पीएमसी बॅंकेमधून खातेदारांना पैसे काढण्यावर बंधनं आहेत, मात्र नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या निवेदनानुसार खातेदार सहा महिन्यांसाठी कमाल 40,000 रूपये बॅंक खात्यामधून काढू शकतात.