PMC Bank branch in Mumbai | (Photo Credits: PTI)

पंजाब अॅन्ड महाराष्ट्र सहकारी बँक (PMC) घोटाळाप्रकरणी ईडीला (ED) एक महत्वपूर्ण माहिती मिळाली आहे. त्यानुसार बँकेचे संचालक राकेश आणि सारंग वधवान यांच्याकडे 2100 एकरपेक्षा अधिक जमीन असल्याचा सुगावा ईडीला लागला आहे. ही जमीन वसई-पालघर मधील सात विविध गावात असल्याचे सांगण्यात येत आहे. तर आता या जमीनीवर जप्ती आणण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाच्या अनुसार, या संपत्तीची एकूण किंमत तब्बल 3500 कोट्यावधी रुपये आहे. वधवान परिवाराकडून ही जमिन टाउनशिप विकसित करण्यासठी खरेदी करण्यात आली होती. मात्र त्या जमीनीवर प्रोजेक्ट सुरु झालाच नाही.

ईडीचे अधिकारी या जमिनीसंबंधित अन्य कागपत्रांची बारकाईने तपासणी करत आहेत. तसेच ही जमीन वधवान यांनी स्वत:च्या नावान खरेदी केली आहे की अन्य एचडीआयएल कंपनीच्या नावावर आहे हे सुद्धा तपासून पाहिले जात आहे. एचडीआयएलच्या संचालकांनी स्वत:च्या नावासह कंपनीच्या नावावर पंजाब अॅन्ड महाराष्ट्र सहकारी बँकेकडून फसवणूक करत कर्ज मिळवले होते. एचडीआयएल सध्या दिवाळखोर म्हणून कारवाई करण्यात आली आहे. हा घोटाळा समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सारंग आणि राकेश वधवान यांना ताब्यात घेतले होते. सुत्रांच्या मते एचडीआयएल आणि त्याचे संचालकांनी पीएमसी बँककडे जवळजवळ 600 एकर जमीन गहाण ठेवली होती. तसेच 400 एकर जमीन सुद्धा अन्य बँकेत संचालकांना गहाणे ठेवली होती.(PMC बँक घोटाळाप्रकरणी धक्कादायक खुलासा, संचालक राकेश-सारंग वाधवान यांची लंडन आणि दुबई येथे प्रचंड संपत्ती)

ईडीला मिळालेल्या माहितीनुसार, पीएमसीकडे 1000 एकर जमीन गहाण ठेवून 800 कोटी रुपयांचे कर्ज बँकेकडून देण्यात आले होते. मात्र अद्याप कर्जाची रक्कमेबाबत कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही. तसेच ईडीकडून ही या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले जात आहे. मनी लॉन्ड्रिंगचा प्रकरण दाखल केल्यानंतर शहरातील वधवान परिवाराकडे असलेल्या संपत्तीची अधिक माहिती समोर आली आहे.