PM Modi In Mumbai (Photo Credits: ANI/Twitter)

मुंबईकरांच्या सेवेसाठी लवकरच मुंबई मेट्रोचं जाळं वाढवण्यात आलं आहे. यामध्ये आज तीन नव्या मेट्रो लाईन्सचा समावेश आहे. तसेच बाणडोंगरी रेल्वे स्टेशनचं उद्धाघटन करण्यात आलं आहे. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते MMRDA च्या विकासकामांचा शिलान्यास करण्यात आला. यामध्ये उन्नत आणि भुयारी मार्गे जाणार्‍या मेट्रो प्रोजेक्टचा समावेश आहे. या कार्यक्रमात पहिल्यांदा Make In India प्रकल्पात तजार केलेल्या मेट्रो कोचचा समावेश आहे. त्याची देखील मोदींनी पहाणी केली. यावेळेस मुंबईकरांना मोदींनी गणेशोत्सवाच्या मराठी भाषेतून शुभेच्छा देखील दिल्या.

अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही चिकाटीने यश प्राप्त कसे करावे हे इस्रोच्या वैज्ञानिकांकडून शिकण्यासारखे आहे. त्याप्रमाणेच मुंबईकरांच्या स्पिरीटचेही मोदींनी कौतुक केले आहे. पायाभूत सोयींसाठी 100 लाख कोटी देणार असल्याची घोषणा मोदींनी केली. यावेळेस मुंबई लोकलचा चेहरा मोहरा बदलेल असा विश्वास व्यक्त केला. 2023 पर्यंत सुमारे 325 किमी मेट्रोचं जाळं मुंबईमध्ये बनवलं जाईल. लोकल इतकेच प्रवासी मेट्रोमध्येही दिसतील. नरेंद्र मोदी मुंबईमध्ये दाखल; महाराष्ट्र दौरा सुरू करण्यापूर्वी घेतले लोकमान्य सेवा संघ टिळक मंदीर येथील गणपतीचं दर्शन

Make In India प्रकल्पात तजार केलेले  मेट्रो कोच

 

MMRDA Tweet 

 

नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे, रामदास आठवले, पियुष गोयल, देवेंद्र फडणवीस आणि गर्व्हनर यांचाही समावेश होता. यावेळेस महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणूकींमध्ये पुन्हा युतीचं सरकार येणार असा विश्वास उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. लवकरच समान नागरी कायदा येईल असा विश्वास व्यक्त केला.