
पिंपरी चिंचवड महापालिकेत (Pimpri-Chinchwad Municipal Corporation० राजकारण अचानक गतिमान झाले आहे. महापालिकेचे उपमहापौर (Deputy Mayor) केशव घोळवे (Keshav Gholave) यांनी काल (शुक्रवार, 5 फेब्रुवारी) अचानक राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे पिंपरी चिंचवड ( (Pimpri-Chinchwad) शहराच्या राजकीय वर्तुळात अनेक उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. केशव घोळवे यांनी मात्र प्रसारमाध्यमांशी बोलताना 'वैयक्तिक कारणावरुन आपण राजीनामा दिला आहे' असे सांगितले. त्यामुळे घोळवे यांनी राजीनाम्याचे कारण व्यक्तिगत असल्याचे जरी सांगितले असले तरी, नेमके कारण काय याबाबत उत्सुकता कायम आहे.
पिंपरी चिंचवड शहरावर सध्या भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता आहे. सहा नोव्हेंबर या दिवशी भाजपने महापौर पदाची केशव घोळवे यांच्या नावाची घोषणा करत त्यांची निवड केली. महत्त्वाचे असे की घोळवे ज्या पदावर उपमहापौर म्हणून आले त्याच पदावर असलेल्या तत्पूर्वीचे उपमहापौर तुषार हिंगे यांना भाजपने डच्चू दिला होता. तुषार हिंगे यांचा पक्षाने मुदतीपूर्वीच राजीनामा घेतला होता.
केशव घोळवे हे एक संघर्षशील व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते. ते उसतोड कामगाराच्या कुटुंबातून येतात. त्यांच्या संघर्षाकडे पाहून पक्षाने त्यांना महापौर केले. मात्र, आता मुदत संपण्यापूर्वीच त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. अवघ्या चारच महिन्यात त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. (हेही वाचा, Murbad Molestation Case: महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी भाजप नगरसेवक नितीन तेलवाने यांना अटक)
महापालिकेत काल स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी निवडणूक होती. या निवडणुकीत भाजपच्या नितीन लांडगे यंनी 10 विरुद्ध 5 अशा मतांनी बाजी मारली. त्यानंतर काही वेळातच घोळवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.