Petrol latest Price Mumbai: तेलाच्या किंमती पुन्हा वाढल्या, मुंबईत पेट्रोल 101 रुपयांच्या पुढे 
Photo Credit - PTI

मुंबईत पुन्हा एकदा पेट्रोल च्या किमतीत वाढ झाली असून. सामान्य मुंबईकरांवरचा बोजा आणखिन वाढणार आहे. तेल कंपन्यांनी रविवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवल्या, त्यामुळे मुंबईत प्रथमच पेट्रोल 101 रुपये आणि दिल्लीत 95 रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचले आहे.देशातील चार महानगरांमध्ये पेट्रोलच्या दरात 27 पैसे आणि डिझेलच्या किंमती 31 पैशांनी वाढविण्यात आल्या. 4 मे पासून आतापर्यंत 19 वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढविण्यात आल्या आहेत, तर उर्वरित 15 दिवसांच्या किंमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. या काळात दिल्लीत पेट्रोल 4.63 आणि डिझेल 5. 22 रुपयांनी महाग झाले आहे.इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या मते राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि मुंबईतील पेट्रोलची किंमत अनुक्रमे 27-27 पैशांनी वाढून अनुक्रमे 95.03 रुपये 101.25 रुपये प्रति लीटर वर पोहचले आहे.

 

कोलकातामध्ये पेट्रोल 26 पैशांनी 95.02 रुपये आणि डिझेल 29 पैशांनी 88.80 रुपये प्रति लिटर महागले आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलच्या दरात 24 पैसे आणि डिझेलच्या किंमती 28 पैशांनी वाढल्या आहेत. तेथे एक लिटर पेट्रोल .96.47 रुपये आणि एक लिटर डिझेल 90.66 रुपये ला मिळत आहे.

शहरानुसार पेट्रोल आणि डिझेल चा भाव 

मुंबई                101.52 ली. पेट्रोल      93.58  ली.डिझेल

दिल्ली              95.03  ली. पेट्रोल      86.22  ली.डिझेल

चेन्नई                96.71    ली. पेट्रोल     90.92  ली.डिझेल

कोलकाता      95.28    ली. पेट्रोल    89.07  ली.डिझेल

आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडच्या किंमती आणि परकीय चलन दरांच्या आधारे दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात. तेल विपणन कंपन्या दरांचा आढावा घेतल्यानंतर दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करतात. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सुधारणा करतात.