पेट्रोल आणि डिझेल (Petrol-Diesel) दरांच्या सततत्या वाढीने सर्वासामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे. नाही म्हणायला अधूनमधून कधितरी हे दर स्थिर राहतात इतकाच काय तो दिलासा. राष्ट्रीय बाजारात आज ( 26 एप्रिल 2022) सकाळी सहा वाजता जारी करण्यात आलेल्या इंधन दरानुसार (Fuel Rates in India) देशातील जनतेला काहीसा दिलासा भेटला आहे. पेट्रोलियम मार्केटिंग कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) म्हणजेच सरकारी तेल कंपन्या (Oil Companies) हे दर जाहीर करत असतात. आज दर स्थिर असून त्यात कोणताही बदल नाही. असे असले तरी, हे स्थिर असलेले दरही उच्चच आहेत. महाराष्ट्रातील सर्वात महाग पेट्रो विक्री होणाऱ्या शहरासह जाणून घ्या देशातील प्रमुख शहरांतील इंधन दर. याशिवाय राज्यातील इतरही विविध जिल्ह्यांमधील इंधन दर इथे देत आहोत.
आयओसीएल (IOCL) ने जारी केलेल्या दरपत्रकानुसार मुंबई शहरात पेट्रोल 120.51 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. तर याच शहरात डिझेल 104.77 रुपये प्रति लिटर आहे. राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल 105.41 रुपये प्रति लिटर तर डिझेल 96.67 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक महाग दराने पेट्रोल विक्री होणारा जिल्हा म्हणजे परभणी. या जिल्ह्यात पेट्रोल 123.47 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. (हेही वाचा, Kerala Man Makes Electric Car: केरळमधील 67 वर्षीय Anthony Joh यांनी घरी बनवली इलेक्ट्रिक कार; फक्त 5 रुपयात धावते 60 किलोमीटर)
भारतातील प्रमुख शहरांतील इंधन दर
शहरं | पेट्रोलच्या किमती (प्रति लिटर) | डिझेलच्या किमती (प्रति लिटर) |
मुंबई | 120.51 रुपये | 104.77 रुपये |
दिल्ली | 105.41 रुपये | 96.67 रुपये |
चेन्नई | 110.85 रुपये | 100.94 रुपये |
कोलकाता | 115.12 रुपये | 99.83 रुपये |
हैद्राबाद | 119.49 रुपये | 105.49 रुपये |
कोलकाता | 115.12 रुपये | 96.83 रुपये |
बंगळुरू | 111.09 रुपये | 94.79 रुपये |
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील इंधन दर
शहरं | पेट्रोलचे दर (प्रति लिटर) | डिझेलचे दर (प्रति लिटर) |
मुंबई | 120.51 रुपये | 104.77 रुपये |
पुणे | 120.60 रुपये | 103.28 रुपये |
नाशिक | 120.02 रुपये | 102.73 रुपये |
परभणी | 123.51 रुपये | 106.08 रुपये |
औरंगाबाद | 120.63 रुपये | 103.32 रुपये |
कोल्हापूर | 120.64 रुपये | 103.35 रुपये |
नागपूर | 121.03 रुपये | 103.73 रुपये |
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. त्यामुळे आगामी काळात इंधन दर आणखीच वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना इंधन दर स्थिरतेचा किती काळ दिलासा मिळतो याबाबत अनिश्चितताच आहे.