Kerala Man Makes Electric Car: आतापर्यंत तुम्ही अनेक इलेक्ट्रिक वाहनांबद्दल ऐकलं असेल. मात्र, केरळमधील एका 67 वर्षीय व्यक्तीने आपल्या रोजच्या प्रवासासाठी इलेक्ट्रिक कार बनवली आहे. केरळच्या कोल्लम जिल्ह्यात राहणाऱ्या एंटोनी जॉन (Anthony Joh) यांनी आपल्या घरी इलेक्ट्रिक कार (Electric Car) बनवली आहे. या कारमध्ये 2-3 लोक बसू शकतात. तसेच एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही कार 60 किमी पर्यंत धावू शकते. एंटोनी जॉन यांना ही कार बनवण्यासाठी फक्त 4.5 लाख रुपये खर्च आला.
व्यवसायाने करिअर सल्लागार असलेले जॉन हे घर आणि ऑफिस दरम्यान प्रवास करण्यासाठी या कारचा वापर करतात. पूर्वी एंटोनी जॉन इलेक्ट्रिक स्कूटर वापरत असतं. पण काळाच्या ओघात त्यांना पाऊस आणि उन्हापासून संरक्षण करणारी इलेक्ट्रिक कार हवी होती. (हेही वाचा - Shocking! पुण्यात Ola Electric Scooter ने अचानक घेतला पेट; कारण अस्पष्ट, कंपनीने दिले चौकशीचे आदेश (Watch Video))
दरम्यान, 2018 मध्ये त्यांनी इलेक्ट्रिक वाहने बनवण्याचा विचार सुरू केला. एंटोनी जॉन यांनी बनवलेल्या कारमध्ये 2 व्यक्ती सहज बसू शकतात. कारची बॉडी गॅरेजने बनवली होती. पण सर्व वायरिंग अँटोनी जॉननेचं केले होते. एंटोनी जॉनच्या घराच्या नावावरून या कारचे नाव 'पुलकुडू' ठेवण्यात आले आहे.
फक्त 5 रुपयांत 60 किमी धावते कार -
कारला स्टीयरिंग, ब्रेक, क्लच, एक्सीलरेटर, हेडलाइट, फॉग लाइट इंडिकेटर आणि फ्रंट आणि बॅक वायपर्स आहेत. या इलेक्ट्रिक कारची रनिंग कॉस्टही खूप कमी आहे. ही कार फक्त 5 रुपयांत 60 किलोमीटरपर्यंत धावू शकते. त्याचा कमाल वेग ताशी 25 किलोमीटर आहे.
FADA च्या आकडेवारीनुसार, गेल्या आर्थिक वर्षात देशातील इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत दुचाकींच्या विक्रीत तिप्पटीहून अधिक वाढ झाली आहे. 2021-22 मध्ये एकूण इलेक्ट्रिक वाहनांची (EV) विक्री 4,29,217 युनिट्सवर पोहोचली, जे आर्थिक वर्ष 2020-21 मधील 1,34,821 युनिट्सपेक्षा तिप्पट आहे.