Petrol and diesel prices in Mumbai: अवघ्या काही तासांमध्ये आपण 2018 या वर्षाला निरोप देणार आहोत. हे वर्ष अनेक घडामोडींनी चर्चेमध्ये राहिलं होतं. त्यापैकी एक म्हणजे इंधनाच्या दराचा उडलेला भडका. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर (Global Crude Oil Rates)वाढल्याने नव्वदीच्या पार गेलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दराने आज 31 डिसेंबर म्हणजे वर्षाच्या शेवटच्या दिवशी या वर्षातला निच्चांकी दर गाठला आहे. मुंबईत आज वर्षभरात पहिल्यांदा पेट्रोल,डिझेलचे दर 75 रूपयांच्या खाली गेले आहेत. Year Ender 2018 : या चांगल्या -वाईट बातम्यांनी 2018 वर्षात चर्चेत होता 'महाराष्ट्र'!
काय आहे आजचा मुंबईतील पेट्रोल-डिझेलचा दर ?
मुंबईत आज पेट्रोलचा दर 74.67 तर डिझेलचा दर 66.01रूपये आहे. 2018 मध्ये यंदा पहिल्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये विक्रमी घसरण झाली आहे. मागील दीड महिन्यात सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये घसरण होत आहे. आज हा दर यंदाच्या वर्षातल्या निच्चांकावर पोहचल्याने सामान्यांसाठी ही दिलासादायक बाब आहे.
Petrol and diesel prices at Rs 68.84/litre & Rs 62.86/litre respectively in Delhi. In Mumbai, petrol and diesel prices at Rs 74.47/litre & Rs 65.76/litre respectively pic.twitter.com/ANuCT3srpZ
— ANI (@ANI) December 31, 2018
18 ऑक्टोबरपासून पेट्रोल दरात 13.79, तर डिझेलच्या दरात 12.06 रुपयांची घसरण झाली आहे.