PDCC Bank | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

पुणे जिल्हा सहकारी बँक (PDCC Bank Election 2022 Result) निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु आहे. एकूण 21 पैसी 14 जागा आगोदरच बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरीत सात जागांसाठी निवडणुक लागली. यापैकी आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार तीन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच बाजी मारली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पुणे जिल्हा सहकारी बँकेवर (Pune District Central Cooperative Bank) उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेच वर्चस्व पाहायला मिळते आहे. सातपैकी दोन जागांवर राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार आणि राष्ट्रवादीचे नेते सुनील चांदेरे विजयी झाले आहेत. हवेली मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत आहे. त्यामुळे या ठिकाणीही विकास दांड विजयी झाले आहेत. आता उर्वरीत चार जागांची मतमोजणी सुरु आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आतापर्यंत हाती आलेला निकाल (तीन जागा)

शिरुर

  • अशोक पवार -109
  • आबासाहेब गव्हाणे- 21

मुळशी

  • सुनील चांदेरे- 27
  • आत्माराम कलाटे- 18

हवेली

  • विकास दांगट- 73म्हस्के-58
  • एका जागेवर भाजप विजयी

जिल्हा बँकेत आतापर्यंत भाजपच्या वाट्याला एकमेव जागा आली आहे. प्रदीप कंद यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुरेश घुले यांचा पराभव केला आहे. महत्त्वाचे म्हणजे प्रदीप कंद हे मुळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे. मात्र, अलिकडेच त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. प्रदीपक कंद यांनी राष्ट्रवादीच्या सुरेश घुले यांचा 14 मतांनी पराभव केला. राष्ट्रवादीने ही जागा प्रतिष्ठेची केली होती. (हेही वाचा, PDCC Bank Election: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक, 14 जागा बिनविरोध, उर्वरीत 6 जागांसाठी अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला)

पुणे जिल्हा सहकारी बँकेवर अजित पवार यांची प्रदीर्घ काळापासून एकहाती सत्ता आहे. या बँकेवर अजित पवार यांनी सात वेळा अध्यक्षपदाचा मान भूषवला आहे. निवडणुकीत 21 पैकी 14 जागा या आधीच बिनविरोध झाल्या आहेत. केवळ 7 जागांसाठी निवडणूक पार पडली.