पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Pune District Central Co-Operative Bank Election) निवडणुकीसाठी आज (2 जानेवारी) मतदान पार पडत आहे. एकूण 21 जागांपैकी 14 जागा आगोदर बिनविरोध निवडून गेल्या आहेत. आता उर्वरीत 6 जागांसाठी मतदान पार पडत आहे. पाठिमागील वेळी सर्वच्या सर्व म्हणजे 21 जागा अजित पवार (Ajit Pawar) गटाला मिळाल्या होत्या. या वेळी सर्व जागा बिनविरोध करण्यात अपयश आल्याने सहा जागांसाठी निवडणूक पार पडत आहे. या सहा जागा निवडून आणण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. निवडणुकीसाठी मतदान सुरु ही झाले आहे.
जिल्हा बँक ही ग्रामिण अर्थव्यस्थेचा कणा समजला जातो. त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्रावर राजकीय पकड मजबूत ठेवण्यासाठी प्रत्येक नेतृत्व आणि पक्षाचा प्रयत्न हा जिल्हा बँक हातात ठेवण्यावर असतो. दरम्यान, पुणे जिल्हा मध्यवर्थी बँकेसाठी आज ज्या सहा जागांवर मतदान होत आहे त्यामध्ये, अ वर्ग मुळशी आणि शिरुर तालुक्यातील दोन जागा, महिला सर्वसाधारण दोन जागा (क वर्ग आणि ड वर्ग प्रत्येकी 1 जागा), बारामती तालुक्यात 4 जागांचा समावेश आहे. सर्व ठिकाणी महाविकासआघाडीचे उमेदवार उभे आहेत. (हेही वाचा, Sindhudurg District Bank Election Result: सिंधुदुर्ग बँकेच्या विजयानंतर नारायण राणेंचा शिवसेनेवर प्रहार, आता महाराष्ट्राच्या सत्तेकडे लक्ष)
बिनविरोध निवड झालेले उमेदवार
- काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे (भोर)
- काँग्रेस आमदार संजय जगताप (संजय जगताप)
- दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव तालुका,सोसायटी ‘अ’ वर्ग)
- उपमुख्यमंत्री अजित पवार (बारामती)
- दिलीप मोहिते पाटील (खेड)
- राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (ब वर्ग)
- आप्पासाहेब जगदाळे (इंदापूर “अ” वर्ग सोसायटी)
बँकेचे संचालक मंडळ: 21
- अ मतदार संघ (तालुका प्रतिनिधी) : 13
- ब मतदार संघ: 1
- क मतदार संघ: 1
- ड मतदार संघ: 1
- अनुसूचित जाती/जमाती मतदार संघ : 1
- इतर मागासवर्गीय प्रतिनिधी : 1
- विभक्त जाती व प्रजाती : 1
- महिला प्रतिनिधी: 2
विधिमंडळात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येत भाजपला धोबीपछाड दिला. त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामिण जिल्हा बँका यांमधूनही भाजपला दूर ठेवण्यासाठी महाविकासआघाडी जोरदार प्रयत्नशिल आहे. यात अनेक ठिकाणी यश येताना दिसते आहे तर काही ठिकाणी भाजप आपली जागा दाखवून देतो आहे.