Sindhudurg District Bank Election Result: सिंधुदुर्ग बँकेच्या विजयानंतर नारायण राणेंचा शिवसेनेवर प्रहार, आता महाराष्ट्राच्या सत्तेकडे लक्ष
Narayan Rane (Photo Credit- Credit - Twitter)

सिंधुदुर्ग मध्यवर्ती जिल्हा बँकेच्या निवडणुकीत (Sindhudurg District Bank Election) भाजपच्या उमेदवाराचा (BJP Win) विजय झाला आहे. महाविकासआघाडीच्या (MVA) पॅनलचा धुव्वा उडाला आहे. या विजयानंतर नारायण राणें (Narayan Rane) यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हा विजय माझा नसुन भाजपचा आहे. सर्व कार्यकर्ते आणि नितेश राणे (Nitesh Rane) यांनी घेतलेली मेहनत कामाला आली आहे असंही त्यांनी म्हटलं. जनेतेन अक्कल असणाऱ्यांकडे सिंधुदुर्ग मध्यवर्ती बँकेची जबाबदारी दिली असल्याचा टोला केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे. तसेच सिंधुदुर्गच्या निवडणुकीनंतर आता राज्यात भाजपची सत्ता आणणार असल्याचं नारायण राणे म्हणाले. राज्यात भाजपची सत्ता हवीय, 'लगान'ची टीम नको असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

नारायण राणें पुढे म्हणतात, जिल्ह्यातील देव देवता आणि जनता यांच्या आशीर्वादामुळे ही सत्ता आली आहे. तसेच भाजपचे सर्व कार्यकर्ते आणि आमदार नितेश राणे यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे हा विजय मिळवला आहे. त्यामुळे याचे सर्व श्रेय नितेश राणे, निलेश राणे, महिला कार्यकर्ता आणि जिल्हा अध्यक्षांना  जाते. सिंधुदुर्गाचा विजय म्हणजे जिल्ह्यातील सर्व देव देवतांचा विजय झाला आहे. यानंतर आता पुढील निवडणुकांकडे पाहणार असल्याचे नारायण राणे म्हणाले आहेत.

नारायण राणें म्हणतात आता लक्ष महाराष्ट्राकडे. तसेच महाराष्ट्रात आगामी निवडणुकांमध्ये ज्या काही विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका होतील तेव्हा भाजपचाच विजय होईल. सिंधुदुर्गातील लोकांना तेच तेच चेहरे पाहवत नाही आहेत. त्यामुळे अशा लोकांना जनता लोकप्रतिनिधी म्हणून ठेवणार नाहीत असेही नारायण राणे यांनी म्हटलं आहे. (हे ही वाचा Sindhudurg District Bank Election Result: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपच्या पॅनेलचं वर्चस्व, राणेंनी राखला गड; पहा विजयी उमेदवारांची यादी.)

पोस्टरबाजीवरुन सेनेला सुनावल

मुंबईत जी नितेश राणेंविरोधात पोस्टरबाजी करण्यात आली त्याबद्दल विचारलं असता नारायण राणेंनी शिवसेनेला चांगलच सुनावल. 'हे पोस्टर लावण्याच्याच लायकीचे आहेत. एका हातात गम दुसऱ्या हातात पोस्टर लावत फिरा महाराष्ट्रभर. हे ना बँकेवर राज्य करू शकतात ना महाराष्ट्रात' असा टोला नारायण राणेंनी शिवसेनेला लगावला आहे.

या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला आहे तर भाजपला ही सत्ता 11 जागा जिंकत मिळवता आली आहे. महाविकास आघाडीला आठ जागांवर विजय मिळवता आला आहे. भाजपच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या या निवडणुकीमध्ये विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत व विद्यमान उपाध्यक्ष सुरेश दळवी यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दुसरीकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला आहे.