Sindhudurg District Bank Election Result: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपच्या पॅनेलचं वर्चस्व, राणेंनी राखला गड; पहा विजयी उमेदवारांची यादी

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक निकालामध्ये भाजपच्या सिद्धिविनायक सहकार पॅनलने 19 पैकी 11 जागी विजय मिळवत आपलं वर्चस्व राखलं आहे. तर महाविकास आघाडीचे सहकार समृद्धी पॅनेल 8 जागांवर विजयी झाले आहे.

Sindhudurg District Bank Election Result: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपच्या पॅनेलचं वर्चस्व, राणेंनी राखला गड; पहा विजयी उमेदवारांची यादी
नारायण राणे (फोटो सौजन्य-ट्वीटर)

कोकणात शिवसेना (Shiv Sena) विरूद्ध नारायण राणे (Narayan Rane)  ही खडाजंगी पुन्हा सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक निकालाच्या (Sindhudurg District Bank Election Result) माध्यमातून पहायला मिळाली. या निवडणूकीमध्ये काही धक्कादायक निकाल लागले असले तरीही नारायण राणे यांनी पुन्हा आपला गड राखण्यात विजय मिळवला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक निकालामध्ये भाजपच्या सिद्धिविनायक सहकार पॅनलने (Siddhivinayak Sahakar Panel) 19 पैकी 11 जागी विजय मिळवत आपलं वर्चस्व राखलं आहे. तर महाविकास आघाडीचे सहकार समृद्धी पॅनेल 8 जागांवर विजयी झाले आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक निकालामध्ये विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्षांचा पराभव झाला आहे. अध्यक्ष सतीश सावंत यांचा पराभव झाला आहे. सतीश सावंत पूर्वी नारायण राणेंचे सोबती होते मात्र 2 वर्षांपूर्वी त्यांनी राणेंची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची गणितं बदलली होती. मात्र आज सतीश सावंत आणि त्यांचे विरोधक विठ्ठल देसाई यांना समान मतं पडल्यानंतर चिठ्ठी टाकून निकाल लावण्यात आला त्यामध्ये विठ्ठल देसाई विजयी झाले आहेत. सतीश सावंत यांच्या निकालाप्रमाणेच भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेलींचा पराभव देखील धक्कादायक होता.

विजयी उमेदवार यादी

  • सावंतवाडी- विद्याधर परब (शिवसेना)
  • वैभववाडी -दिलीप रावराणे (भाजपा)
  • मालवण- व्हिक्टर डांटस (एनसीपी)
  • दोडामार्ग- गणपत देसाई (शिवसेना)
  • कुडाळ- विद्याप्रसाद बांदेकर (काँग्रेस)
  • कणकवली- विठ्ठल देसाई (भाजपा)
  • सहकारी पणन संस्था शेती प्रक्रिया संस्था व ग्राहक सहकारी संस्था मतदारसंघ अतुल काळसेकर (भाजपा)
  • सहकारी संस्था, नागरी पतपुरवठा संस्था, पगारदार नोकरांच्या संस्था- सुशांत नाईक (शिवसेना)
  • औद्योगिक संस्था मजूर संस्था जंगल कामगार संस्था मोटार वाहतूक संस्था मतदारसंघ - गजानन गावडे (भाजपा)
  • इतर मागास मतदार संघ - रविंद्र मडगावकर (भाजपा)
  • विमुक्त भटक्या जमाती - मेघनाद धुरी
  • अनुसूचित जाती जमाती मतदार संघ - आत्माराम ओटणेकर
  • मजूर संस्था मतदारसंघ भाजप प्रणित उमेदवार गजानन गावडे
  • वैयक्तिक मतदारसंघातून भाजप प्रणित समीर सावंत
  • गृहनिर्माण संस्था मतदारसंघांमध्ये भाजप प्रणीत संदीप उर्फ बाबा परब
  • मच्छीमार आणि दुग्ध विकास संस्था मतदारसंघांमध्ये भाजप प्रणीत महेश सारंग
  • वेंगुर्ले तालुक्यामध्ये भाजपप्रणीत पॅनलचे मनीष दळवी
  • देवगड तालुक्यामध्ये भाजप प्रणित प्रकाश बोडस

भाजपाच्या विजयानंतर नितेश राणे आणि निलेश राणे यांनी सोशल मीडीयातून आपल्या पहिल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. खासदार निलेश राणेंनी  'ही सिंधुदुर्गाची माती आहे इथे खरं करणाऱ्यालाच न्याय मिळतो.' असं म्हटलं आहे तर नितेश राणेंनी 'गाडलाच' म्हणत एक पोस्ट  केली आहे. गाव  पातळीवरील जिल्हा बॅंकेची निवडणूक सिंधुदुर्गामध्ये चर्चेत होती.  निवडणुकीत प्रचारामध्ये शिवसेनेचे संतोष परब यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. या हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप ठेवण्यात आले असून त्यानंतर नितेश राणे अज्ञातवासात आहेत. तर नारायण राणे देखील सिंधुदुर्गात तळ ठोकून बसले आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Dec 31, 2021 12:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).