कल्याण च्या पत्री पूलचंं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण; नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका
कल्याण पत्री पूल । Photo credits: Twiiter/ DrSEShinde

कल्याण डोंबिवली मधील नागरिकांच्या बहुप्रतिक्षित पत्री पुलाचं (Kalyan’s Patripool) आज (25 जानेवारी) अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांची मोठ्या वाहतूक कोंडी मधून सुटका होणार आहे. दरम्यान 2018 साली या पुलाचं भूमिपूजन झालं होतं. त्यानंतर आता अखेर हा पूल प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारा त्याचं उद्घाटन केले आहे. तर याप्रसंगी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, कॅबिनेट मिनिस्टर एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि स्थानिक आमदारही उपस्थित होते.

दरम्यान आज या पत्री पूल उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलताना भाजपा खासदार कपिल पाटील यांनी या पुलाला डॉ. अब्दुल कलाम यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. दरम्यान त्याबाबतचे निवेदनही दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. KDMC: वगळलेली 'ती' 18 गावे आता कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतच; मुंबई उच्च न्यायायालयाचा निर्णय.

पत्री पूल हा ब्रिटिशकालीन पूल होता. 2018 साली तो वाहतूकीसाठी धोकादायक असल्याचं समोर आलं. त्यानंतर तो बंद करण्यात आला. 26 महिने या पूलाचं काम चालू होतं. त्यामुळे या भागात नागरिकांची तासन तास वाहतूक कोंडी होत होती. मात्र आता या पूलाचं काम पूर्ण झालं असून लोकार्पणानंतर पूल प्रवाशांसाठी खुला होत आहे. हा पूल कल्याण पूर्व- पश्चिम जोडणार आहे.