Patra Chawl Land Scam Case: पत्राचाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी Sanjay Raut ED च्या ताब्यात; 9  तासांच्या चौकशीनंतर कारवाई
Shiv Sena MP Sanjay Raut | (File Photo)

पत्राचाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी आज सकाळपासून शिवसेना नेते आणि  सेनेचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut)  यांच्या घरी ईडीने (ED)  धाड टाकून कारवाई सुरू केली होती. मुंबई मध्ये ईडीची 3 पथकं काम करत होती. त्यांच्या 9 तासांच्या कारवाई नंतर आता ईडी कडून संजय राऊत यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या निवासस्थानीच ही कारवाई पूर्ण करण्यात आली आहे. दरम्यान मुंबईतील त्यांच्या 'मैत्री' या निवासस्थानावरून ईडी कार्यालयात नेले जाणार आहे. आणि ईडी कार्यालयात नेल्यानंतर त्यांच्या अटकेची कारवाईबाबत पुढील चित्रं स्पष्ट होणार आहे. नक्की वाचा: Sanjay Raut On ED Raid: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेत संजय राऊत यांनी घोटाळ्याचे आरोप फेटाळले; पहा ट्वीट्स! 

मुंबई मध्ये 'मैत्री' या संजय राऊत यांच्या निवासस्थानाबाहेर मोठा फौजफाटा सकाळपासूनच तैनात करण्यात आला आहे. त्यामध्ये सीआरपीएफ जवान आहेत. मुंबई पोलिसांच्या मदतीने ते  ही कारवाई पूर्ण करणार आहेत. दरम्यान पीएमपीएल अ‍ॅक्ट अंतर्गत ईडी कारवाई करत आहेत. नक्की वाचा: Patra Chawl Land Scam Case: ज्या पत्राचाळ प्रकरणामुळे Sanjay Raut, ED च्या रडार वर आले ते नेमके काय? 

संजय राऊत यांच्या घरी त्यांच्या पत्नी वर्षा राऊत, मुलगी, भाऊ उपस्थित आहेत. संजय राऊत यांच्या निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांची मोठी गर्दी आहे. त्यांना रोखत राऊतांना बाहेर काढण्याचं आव्हान पोलिस यंत्रणांसमोर आहे. शिवसैनिकांकडून ईडी विरूद्ध, पंतप्रधानांविरूद्ध घोषणाबाजी केली जात आहे.

मागील दोन वेळेस पत्राचाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी दोनदा समन्स देऊनही ते ईडी कार्यालयामध्ये हजर राहिले नव्हते. त्यामुळे राऊत ईडीला सहकार्य करत नसल्याचं सांगत ईडीने आज सकाळी धाड टाकली. मैत्री सोबतच दादर मधील फ्लॅट मध्येही ईडीने आज चौकशी केली आहे.