शिवसेना नेते संजय राऊत यांच्या 'मैत्री' निवासस्थानी आज सकाळी ईडी चे 10 अधिकारी पोहचले आहेत. त्यांची पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी चौकशी सुरू आहे. त्यांच्या कुटुंबियांची घरी चौकशी सुरू आहे. मात्र दुसरीकडे राऊतांनी ट्वीटर वरून प्रतिक्रिया देताना 'खोटी कारवाई.. खोटे पुरावे मी शिवसेना सोडणार नाही.. मरेन पण शरण जाणार नाही. असे म्हटलं आहे. सोबतच  शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेत त्यांनी घोटाळ्याचे आरोप फेटाळले आहेत.

पहा ट्वीट्स

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)