मुंबई-गोरखपूर अंत्योदय एक्स्प्रेस मधील प्रवाशांना पुढील प्रवासासाठी विशेष ट्रेन सह मोफत चहा-नाश्ताची सोय
Train Derailment Representational Image (Photo Credits: ANI)

कसारा इगतपुरी (Kasara-Igatpuri) दरम्यान 12598 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-गोरखपूर अंत्योदय एक्स्प्रेसचा (Antyodaya Express) एक डबा घसरुन विस्कळीत झालेली वाहतूक आता हळूहळू पूर्ववत होत आहे. मुंबई-गोरखपूर एक्स्प्रेस मधील सर्व प्रवाशांना एका विशेष ट्रेनमध्ये स्थलांतरीत करण्यात आले असून या ट्रेनने पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. तसंच या दुर्घटनेमुळे प्रवाशांची झालेली गैरसोय लक्षात घेऊन घटनास्थळी आणि इगतपुरी स्टेशनवर प्रवाशांसाठी मोफत चहा-नाश्ताची सोय करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. (मुंबई-गोरखपूर अंत्योदय एक्स्प्रेसचा डबा घसरला; मुंबई नाशिक रेल्वे वाहतूक ठप्प)

आज (18 जुलै) पहाटे 3.50 च्या सुमारास झालेल्या या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी हेल्पलाईन क्रमांक- 022-22694040 जाहीर केला होता.

ANI ट्विट:

मुंबई-गोरखपूर एक्स्प्रेसचा डबा घसल्याने मुंबई-नाशिक वाहतूक देखील ठप्प झाली होती. मात्र डबा रुळावरुन हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु होते. ते पूर्ण झाल्यानंतर विशेष ट्रेनसह पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली.

पावसाला सुरुवात होताच मध्य रेल्वेची वाहतूक विविध कारणांमुळे कोलमडत आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे ऐन कामाला जाण्याच्या घाई-गर्दीत रेल्वेचा झालेला खोळंबा प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे.